फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प
फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प (अन्य लेखनभेद: फुकुशिमा दायची अणुऊर्जा प्रकल्प, फुकुशिमा दाय-इची अणुऊर्जा प्रकल्प ; जपानी: 福島第一原子力発電所, फुकुशिमा दाय-इची गेन्शिऱ्योकू हात्सुदेन्शो; रोमन लिपी: Fukushima I NPP ;) हा जपानातल्या फुकुशिमा विभागात असलेला एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. २६ मार्च, इ.स. १९७१ रोजी कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पात सहा अणुभट्ट्या असून त्यांची एकत्रित ऊर्जार्निमिती क्षमता ४.७ गिगावॉट आहे. मार्च, इ.स. २०११मध्ये झालेल्या भूकंप व त्सुनामीमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाला. अणुभट्टीतील उष्णता वाढल्याने झालेल्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गाला सुरुवात झाली. तिसऱ्या क्रमांक अणुभट्टीत हायड्रोजनचा स्फोट झाल्याने या अणुभट्टीतून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली. काही काळातच अणुऊर्जा प्रकल्पातील तिसऱ्या अणुभट्टीतून किरणोत्सर्ग सुरू झाला. त्याचप्रमाणे दुसरी अणुभट्टी स्फोटात वितळल्यामुले तिथूनही किरणोत्सर्ग झाला. फुकुशिम्यामध्ये निर्माण झालेले संकट हे चौथ्या दर्जाचं गंभीर संकट असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा शास्त्रज्ञांनी घोषित केले.
परिणाम
या प्रकल्पाच्या परिसरातल्या सुमारे ४५,०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जपानमध्ये एकूण ५४ व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यापैकी १० प्रकल्प भूकंपानंतर बंद करण्यात आले.
बाह्य दुवे
- तोक्यो विद्युत कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ (जपानी मजकूर)