फुकुओका पेपे डोम
फुकुओका पेपे डोम | |
---|---|
मागील नावे | फुकुओका डोम |
गुणक | 33°35′43″N 130°21′44″E / 33.59528°N 130.36222°Eगुणक: 33°35′43″N 130°21′44″E / 33.59528°N 130.36222°E |
चालविणारे (ऑपरेटर) | हॉक्स टाऊन कंपनी |
वरचा पृष्ठभाग (सरफेस) | फिल्डटर्फ २००९ पासून ॲस्ट्रोटर्फ १९९३ ते २००८ |
बांधकाम खर्च | ¥76 billions |
आर्किटेक्ट | टेकनाका कॉर्पोरेशन आणि मॅडा कॉर्पोरेशन |
सामान्य कंत्राटदार | टेकनाका कॉर्पोरेशन आणि मॅडा कॉर्पोरेशन |
फील्ड परिमाण | डावे फिल्ड – १०० मीटर (३२८ फूट) डावे - मध्य – ११८ मीटर (३८७ फूट) मध्य फिल्ड – १२२ मीटर (४०० फूट) उजवे - मध्य – ११८ मीटर (३८७ फूट) उजवे फिल्ड – १०० मीटर (३२८ फूट) बाहेरील कुंपणाची उंची: ५.८४ मीटर (१९ फूट) |
फुकुओका पेपे डोम (福岡ペイペイドーム ) हे एक बेसबॉलचे मैदान आहे. जपानच्या चौकु, फुकुओका येथे स्थित आहे. १९९३ मध्ये बांधलेल्या या स्टेडियमचे मूळ नाव फुकुओका डोम (福岡ドーム ) होते. याची प्रेक्षक क्षमता ३८,५८५ आसनांची आहे.[१][२] याच्या मैदानाचा व्यास २१६ मीटर आहे. फुकुओका पेपे डोम हा जगातील सर्वात मोठा भौगोलिक घुमट आहे.[३] मागे-पुढे होणारे छत असणारे जपानचे हे पहिले स्टेडियम आहे. २००५ मध्ये, याहू! जपान, सॉफ्टबँकच्या सहाय्यक कंपन्यांपैकी एक, या कंपनीने स्टेडियमचे नामकरणाचे हक्क संपादन केले आणि त्याचे नाव फुकुओका याहू जपान डोम (福岡Yahoo! JAPANドーム ) आणि याचे छोटे नावे याहू डोम (ヤフードーム ) असे ठेवले.[४] जानेवारी २०१३ मध्ये त्याचे नाव फुकुओका याफुओकु डोम (福岡 ヤフオク! ドーム ) असे ठेवण्यात आले.[५] जपान मध्ये याफुओकू म्हणजे याहू! लिलाव . ३० ऑक्टोबर २०१९ रोजी घोषित करण्यात आले होते की २९ फेब्रुवारी २०२० पासून स्टेडियमचे नाव फुकुओका पेपे डोम असे होईल.[६][७] हे नाव पेपे नावाच्या कंपनीला समर्पित आहे, या कंपनीत सॉफ्टबँकचे ५०% आणि याहू जपानचे २५% समभाग आहेत.
इतिहास
फुकुओका डोम हे फुकुओका सॉफ्टबँक हॉक्स या टीमचे होम स्टेडियम आहे. हिल्टन फुकुओका सी हॉक हॉटेल समवेत हॉक्स टाऊन मनोरंजन संकुलाचा एक भाग आहे.[४] तो मोमोची बीच जवळ आहे. तोजिनमाची सबवे स्टेशनपासून सुमारे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
२००६ मध्ये, स्टेडियमचा मुख्य स्कोअरबोर्ड "हॉक्स व्हिजन"च्या मोनो-कलर मध्ये अपग्रेड झाला. त्याच्या पूर्वी असलेल्या स्कोअरबोर्डचे देखील "हॉक्स व्हिजन" असेच टोपणनाव होते. नवीन स्कोअरबोर्डचा आकार १० मी (३२.७६ फूट) उंच आणि ५३ मी (१७३.८६ फूट) रुंद आहे. तो त्यावेळचा सर्वात मोठ्या हाय-डेफिनिशन इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्डपैकी एक होता. तो दोन १२३-इंच रुंद-स्क्रीनच्या बरोबरीचा होता. २०१० मध्ये, दोन ५.७ मी (१२०.६५ फूट) × ३३ मी (१०८.२७ फूट) फलकांची भर पडली. याचे एकूण क्षेत्र ९०५.२ वर्गमटर किंवा ९,७४३.४९ वर्गफूट ईतके झाले. या स्टेडियमने सर्व बेसबॉल स्टॅडियात एचडी डिस्प्लेचे सर्वात मोठा स्कोअरबोर्ड आहे.[१]
फुकुओका डोमने प्रत्येक मेजर लीग बेसबॉल जपान ऑल-स्टार मालिकेमधील एक गेम आयोजित केला आहे. यात २००६ च्या मालिकेचा अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे. जपानच्या इव्हेंटच्या इतिहासात पहिल्यांदा जपान अंतिम सामन्यात हरला होता.[८]
एक्स्ट्रीम इंजिनीअरिंग या टीव्ही मालिकेत डॅनी फोर्स्टर फुकुओका डोमचा संदर्भ देताना असे म्हणतात की त्यास "फ्लोटिंग" फील्ड आहेत. जपानमधील इनडोअर बेसबॉल स्टेडियम ज्यामध्ये खरोखरच तरंगते मैदान आहे ते म्हणजे सप्पोरो डोम). तथापि, या स्टेडियममध्ये असे मैदान नाही. २००९ मध्ये, जुने अॅस्ट्रोटर्फ फील्ड बदलून सामान्य फील्डटर्फ ब्रँड टाकण्यात आला. हा नवीन टर्फमुळे खेळाडूंना कमी जखमा होतात. जपानमधील इतर संघांपेक्षा हॉक्सच्या खेळाडूंना जास्त दुखापत झाल्याची आढळून आली होती.
संदर्भ
- ^ a b "福岡ソフトバンクホークス オフィシャルサイト". July 13, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ "2017年度 福岡 ヤフオク!ドームの定員に関しまして" (जपानी भाषेत). Fukuoka SoftBank Hawks. March 2, 2017. October 5, 2018 रोजी पाहिले.
- ^ Glancey, Jonathan (October 21, 2014). "The story of Buckminster Fuller's radical geodesic dome". BBC. October 5, 2018 रोजी पाहिले.
- ^ a b "Hawkstown -Hawks Town a lively and festive place 365days a year". www.hawkstown.com. 2016-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ "ヤフオク! - 福岡 Yahoo! JAPANドーム名称変更のお知らせ" (जपानी भाषेत). Yahoo! Japan. October 5, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Hawks' stadium to be renamed PayPay Dome next season". The Japan Times Online. 30 October 2019. 2019-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "2020年2月29日(土)「福岡PayPayドーム」誕生 - プレスリリース" (Press release) (जपानी भाषेत). 11 March 2020 रोजी पाहिले.
- ^ MLB completes sweep with walk-off
बाह्य दुवे
- सॉफ्टबँक हॉक्सच्या अधिकृत वेबसाइटवरील स्टेडियम पृष्ठ (जपानी भाषेत)
मागील हेवाडाई स्टेडियम | फुकुओका सॉफ्टबँक हॉक्सचे होम १९९३ पासून | पुढील सध्या |
मागील पायलट फिल्ड USA | युनिव्हर्सिडे १९९५ | पुढील अँजेलो मॅसिमिनो स्टेडियम Italy |