फुकुओका
फुकुओका 福岡市 | |||
जपानमधील शहर | |||
| |||
फुकुओका | |||
देश | जपान | ||
बेट | क्युशू | ||
प्रांत | फुकुओका | ||
प्रदेश | क्युशू | ||
क्षेत्रफळ | ३४० चौ. किमी (१३० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १५,८८,९२४ | ||
- घनता | ४,२५३.८ /चौ. किमी (११,०१७ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ) | ||
www.city.fukuoka.lg.jp |
फुकुओका (जपानी: 福岡市) ही जपान देशाच्या फुकुओका प्रांताची राजधानी व क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. सुमारे २५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले फुकुओका शहर जपानमधील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. २०१० मधील एका परिक्षणानुसार फुकुओका हे जगातील १४वे सर्वोत्तम निवासयोग्य शहर मानले गेले आहे.
जपानमधील शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेमार्गावरील फुकुओका हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथे ओसाकाकडे धावणारा सॅन्यो शिनकान्सेन तसेच कागोशिमाकडे धावणारा क्युशू शिनकान्सेन हे दोन प्रमुख मार्ग जुळतात. येथील फुकुओका विमानतळ क्युशू बेटावरील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील फुकुओका पर्यटन गाईड (इंग्रजी)