Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार

સર્વશ્રેષ્ઠ અભિનેત્રી તરીકેનો ફીલ્મફેર પુરસ્કાર (gu); Premi Filmfare a la millor actriu (ca); Gwobr Filmfare am yr Actores Orau (cy); Filmfare մրցանակ լավագույն կանացի դերի համար (hy); Filmfare Award for bedste skuespillerinde (da); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (ne); フィルムフェア賞 主演女優賞 (ja); Filmfarepris för bästa kvinnliga skådespelare (sv); Filmfare Award за найкращу жіночу роль (uk); Filmfare Award барои беҳтарин нақши зан (tg); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (hi); Filmfare Award барои беҳтарин нақши зан (tg-cyrl); Filmfare Award per la miglior attrice (it); শ্রেষ্ঠ অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice (fr); फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (mr); Филмфер за најбољу главну глумицу (sr); Nagrada Filmfare za najbolju glumicu (sh); فلمفير جايزه د ښه لوبګري لپاره (ps); Premio Filmfare á mellor actriz (gl); Filmfare Award/Beste Hauptdarstellerin (de); Penghargaan Filmfare untuk Aktris Terbaik (id); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki (pl); פרס פילמפייר לשחקנית הטובה ביותר (he); Filmfare Award voor beste actrice (nl); Anugerah Filmfare untuk Pelakon Wanita Terbaik (ms); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (mai); فلم فیئر اعزاز برائے بہترین اداکارہ (ur); جایزه فیلم‌فیر بهترین بازیگر زن (fa); Filmfare Award for Best Actress (en); جائزة فيلم فير لأفضل ممثلة (ar); Βραβείο Filmfare Καλύτερου Α' γυναικείου ρόλου (el); Filmfare Award за лучшую женскую роль (ru) শ্রেষ্ঠ অভিনেত্রীর জন্য ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Récompense pour une actrice indienne (fr); પુરસ્કાર (gu); Best Actress (en); Anugerah aktris terbaik (id); सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (hi); सर्वोत्तम अभिनेत्री (mr) Филмфер награда за најбољу главну глумицу (sr); フィルムフェア賞 最優秀主演女優賞, スター・スクリーン・アワード 最優秀主演女優賞 (ja); جائزة فيلم فير افضل ممثلة (ar); Filmfer nagrada za najbolju glumicu (sh)
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार 
सर्वोत्तम अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी,
सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
विजेता
स्थापना
  • इ.स. १९५४
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे.

प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती.[] पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोलआलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडियाजया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विजेते व नामांकन

नूतन, काजोलआलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे.
बिमल रॉय (सर्वोत्तम दिग्दर्शक), मीना कुमारी (सर्वोत्तम अभिनेत्री) आणि नौशाद (सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक) हे आपल्या पहिल्या पुरस्कारांसोबत.
माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.
वर्षविजेत्यांचे चित्रविजेताचित्रपट
१९५४मीना कुमारीबैजू बावरा
अन्य नामांकन नाही
१९५५ मीना कुमारीपरिणीता
अन्य नामांकन नाही
१९५६कामिनी कौशलबिरज बहू
गीता बालीवचन
मीना कुमारीआझाद
१९५७नूतनसीमा
अन्य नामांकन नाही
१९५८नर्गिसमदर इंडिया
अन्य नामांकन नाही
१९५९वैजयंतीमालासाधना
मीना कुमारीसहारा
वैजयंतीमालामधूमती
१९६०नूतनसुजाता
माला सिन्हाधूल का फूल
मीना कुमारीचिराग कहा रोशनी कहा
१९६१बीना रायघूंघट
मधुबालामुघल-ए-आझम
नूतनछलीया
१९६२वैजयंतीमालागंगा जमना
पद्मीनीजिस देश में गंगा बहती हैं
सायरा बानूजंगली
१९६३मीना कुमारीसाहिब बीबी और गुलाम
मीना कुमारीआरती
मीना कुमारीमैं चूप रहुंगी
१९६४नूतनबंदिनी
माला सिन्हाबहुरानी
मीना कुमारीदिल एक मंदीर
१९६५वैजयंतीमालासंगम
माला सिन्हाजहांआरा
साधनावो कौन थी?
१९६६मीना कुमारीकाजल
माला सिन्हाहिमालय की गोद में
साधनावक्त
१९६७वहीदा रेहमानगाईड
मीना कुमारीफूल और पत्थर
सुचित्रा सेनममता
१९६८नूतनमिलन
सायरा बानूशागिर्द
वहिदा रेहमानराम और शाम
१९६९वहीदा रेहमाननील कमल
नर्गीस दत्तरात और दिन
सायरा बानूदिवाना
१९७०शर्मिला टागोरआराधना
आशा पारेखचिरग
नंदाइत्तेफाक
१९७१मुमताजखिलौना
शर्मिला टागोरसफर
वहिदा रेहमानखामोशी
१९७२आशा पारेखकटी पतंग
जया बच्चनगुड्डी
जया बच्चनउपहार
१९७३हेमा मालिनीसीता और गीता
मीना कुमारीपाखिजा
राखी गुलजारआंखो आंखो में
१९७४डिंपल कापडियाबॉबी
जया बच्चनअभिमान
जया बच्चनकोशीश
मौसमी चॅटर्जीअनुराग
नूतनसौदागर
१९७५जया बच्चनकोरा कागझ
हेमा मालिनीअमीर गरीब
हेमा मालिनीप्रेम नगर
सायरा बानूसगीना
शबाना आझमीअंकुर
१९७६लक्ष्मीजुली
हेमा मालिनीखुशबू
हेमा मालिनीसंन्यासी
जया बच्चनमिली
सुचित्रा सेनआंधी
१९७७राखी गुलजारतपस्या
हेमा मालिनीमेहबूबा
राखी गुलजारकभी कभी
रीना रॉयनागीन
शर्मिला टागोरमौसम
१९७८शबाना आझमीस्वामी
हेमा मालिनीकिनारा
राखी गुलजारआदमी
स्मिता पाटीलभूमिका (चित्रपट)
जरीना वहाबघरोंडा
१९७९नूतनमैं तुलसी तेरे आंगन की
राखी गुलजारतृष्णा
रंजिता कौरआंखियों के झरोखों से
रेखाघर
झीनत अमानसत्यम शिवम सुंदरम
१९८०जया बच्चननौकर
हेमा मालिनीमीरा
जया प्रदासरगम
पूनम ढिल्लननूरी
राखीजुर्माना
१९८१रेखाखूबसुरत
रीना रॉयआशा
रेखाजुदाई
शबाना आझमीथोडीसी बेवफाई
झीनत अमानइंसाफ का तराजू
१९८२स्मिता पाटीलचक्र
हेमा मालिनीनसीब
जया बच्चनसिलसिला
राखी गुलजारबसेरा
रती अग्निहोत्रीएक दुजे के लिए
रेखाउमराव जान
१९८३पद्मिनी कोल्हापुरेप्रेम रोग
राखी गुलजारशक्ती
रेखाजीवन धारा
सलमा आघानिकाह
स्मिता पाटीलबाजार
१९८४शबाना आझमीअर्थ
शबाना आझमीअवतार
शबाना आझमीमंडी
शबाना आझमीमासूम
श्रीदेवीसदमा
१९८५ शबाना आझमीभावना
जया प्रदाशराबी
रोहिणी हट्टंगडीसारांश
शबाना आझमीस्पर्श
स्मिता पाटीलआज की आवाज
१९८६डिंपल कापडियासागर
जया प्रदासंजोग
मंदाकिनीराम तेरी गंगा मैली
पद्मिनी कोल्हापुरेप्यार झुकता नाही
रती अग्निहोत्रीतवायफ
१९८७ पुरस्कार नाही
१९८८ पुरस्कार नाही
१९८९रेखाखून भरी मांग
जुही चावलाकयामत से कयामत तक
माधुरी दीक्षिततेजाब
१९९०श्रीदेवीचालबाझ
भाग्यश्री पटवर्धनमैने प्यार किया
माधुरी दीक्षितप्रेम प्रतिज्ञा
श्रीदेवीचांदनी
विजयशांतीईश्वर
१९९१माधुरी दीक्षितदिल
हेमा मालिनीरिहाई
जुही चावलाप्रतिबंध
मीनाक्षी शेषाद्रीजुर्म
१९९२श्रीदेवीलम्हे
डिंपल कपाडियालेकीन...
माधुरी दीक्षितसाजन
रेखाफुल बने अंगारे
झेबा बख्तियारहिना
१९९३माधुरी दीक्षितबेटा
जुही चावलाबोल राधा बोल
श्रीदेवीखुदा गवाह
१९९४जुही चावलाहम हैं राही प्यार के
जुही चावलाडर
डिंपल कपाडियारुदाली
माधुरी दीक्षितखलनायक
मीनाक्षी शेषाद्रीदामिनी
श्रीदेवीगुमराह
१९९५माधुरी दीक्षितहम आपके हैं कौन..!
काजोलये दिल्लगी
माधुरी दीक्षितअंजाम
मनीषा कोईराला१९४२: अ लव्ह स्टोरी
श्रीदेवीलाडला
१९९६काजोलदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
माधुरी दीक्षित राजा
माधुरी दीक्षितयाराना
मनीषा कोईरालाअकेले हम अकेले तुम
उर्मिला मातोंडकररंगीला
१९९७करिश्मा कपूरराजा हिंदुस्तानी
जुही चावलादरार
मनीषा कोईरालाखामोशी: द म्युझिकल
सीमा बिस्वासबँडिट क्वीन
तब्बूमाचिस
१९९८माधुरी दीक्षितदिल तो पागल है
जुही चावलायेस बॉस
महिमा चौधरीपरदेस
श्रीदेवीजुदाई
तब्बूविरासत
१९९९काजोलकुछ कुछ होता है
काजोलदुश्मन
काजोलप्यार तो होना ही था
मनीषा कोईरालादिल से..
उर्मिला मातोंडकरसत्या
२०००ऐश्वर्या रायहम दिल दे चुके सनम
ऐश्वर्या रायताल
काजोलहम आपके दिल में रहते हैं
करिश्मा कपूरबिवी नंबर १
तब्बूहु तू तू
२००१करिश्मा कपूरफिजा
ऐश्वर्या रायहमारा दिल आपके पास है
माधुरी दीक्षितपुकार
प्रीती झिंटाक्या कहना
तब्बूअस्तित्व
२००२काजोलकभी खुशी कभी गम
अमिषा पटेलगदर: एक प्रेम कथा
करीना कपूरअशोका
करिश्मा कपूरझुबेदा
तब्बूचांदनी बार
२००३ऐश्वर्या रायदेवदास
अमिषा पटेलहमराज
बिपाशा बसूराझ
करिश्मा कपूरशक्ती: द पॉवर
राणी मुखर्जीसाथिया
२००४प्रीती झिंटाकल होना हो
भूमिका चावलातेरे नाम
हेमा मालिनीबागबान
प्रीती झिंटाकोई... मिल गया
राणी मुखर्जीचलते चलते
उर्मिला मातोंडकरभूत
२००५राणी मुखर्जीहम तुम
ऐश्वर्या रायरेनकोट
प्रीती झिंटावीर-झारा
शिल्पा शेट्टीफिर मिलेंगे
उर्मिला मातोंडकरएक हसीना थी
२००६ राणी मुखर्जीब्लॅक
प्रीती झिंटासलाम नमस्ते
राणी मुखर्जीबंटी और बबली
शर्मिला टागोरविरुद्ध... फेमीली कम्स फर्सट
विद्या बालनपरिणीता
२००७काजोलफना
ऐश्वर्या रायधूम २
बिपाशा बसूकॉर्पोरेट
करीना कपूरओंकारा
राणी मुखर्जीकभी अलविदा ना कहना
२००८करीना कपूरजब वी मेट
ऐश्वर्या रायगुरु
दीपिका पदुकोणओम शांती ओम
माधुरी दीक्षितआजा नचले
राणी मुखर्जीलगा चुनरी में दाग
विद्या बालनभूल भुलैया
२००९प्रियांका चोप्राफॅशन
ऐश्वर्या राय बच्चनजोधा अकबर
अनुष्का शर्मारब ने बना दी जोडी
असिन तोट्टुंकलगजनी
काजोलयू मी और हम
२०१०विद्या बालनपा
दीपिका पदुकोणलव्ह आज कल
करीना कपूर३ इडियट्स
करीना कपूरकुर्बान
कतरिना कैफन्यू यॉर्क
प्रियांका चोप्राकमिने
२०११काजोलमाय नेम इज खान
ऐश्वर्या राय बच्चनगुजारिश
अनुष्का शर्माबँड बाजा बारात
करीना कपूरगोलमाल ३
विद्या बालनइश्किया
२०१२विद्या बालनडर्टी पिक्चर
माही गिलसाहेब, बीवी और गँगस्टर
कतरिना कैफमेरे ब्रदर की दुल्हन
प्रियांका चोप्रा७ खून माफ
विद्या बालननो वन किल्ड जेसिका
२०१३ विद्या बालनकहानी
दीपिका पदुकोणकॉकटेल
करीना कपूरहिरोईन
परिणीती चोप्राइशकजादे
प्रियांका चोप्राबर्फी!
श्रीदेवीइंग्लिश विंग्लिश
२०१४दीपिका पडुकोणगोलियों की रासलीला राम-लीला
दीपिका पदुकोणचेन्नई एक्सप्रेस
परिणीती चोप्राशुद्ध देसी रोमान्स
श्रद्धा कपूरआशिकी २
सोनाक्षी सिन्हालुटेरा
सोनम कपूररांझना
२०१५कंगना राणावतक्वीन
आलिया भट्टहायवे
माधुरी दीक्षितदेढ इश्किया
प्रियांका चोप्रामेरी कोम
राणी मुखर्जीमर्दानी
सोनम कपूरखूबसुरत
२०१६दीपिका पडुकोणपिकू
अनुष्का शर्माएनएच१०
दीपिका पदुकोणबाजीराव मस्तानी
काजोलदिलवाले
कंगना राणावततनु वेड्स मनू रिटर्न्स
सोनम कपूरडॉली की डोली
२०१७आलिया भट्टउडता पंजाब
ऐश्वर्या राय बच्चनसरबजीत
आलिया भट्टडिअर जिंदगी
अनुष्का शर्माए दिल है मुश्किल
सोनम कपूरनीरजा
विद्या बालनकहानी २
२०१८विद्या बालनतुम्हारी सुलू
आलिया भट्टबद्रीनाथ की दुल्हनिया
भूमी पेडणेकरशुभ मंगल सावधान
सबा कमरहिंदी माध्यम
श्रीदेवीमॉम
झायरा वसीमसिक्रेट सुपरस्टार
२०१९आलिया भट्टराझी
दीपिका पदुकोणपद्मावत
नीना गुप्ताबधाई हो
राणी मुखर्जीहिचकी
तब्बूअंधाधुन
२०२० आलिया भट्टगल्ली बॉय
कंगना राणावतमणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी
करीना कपूरगुड न्यूज
प्रियांका चोप्राद स्काय इज पिंक
राणी मुखर्जीमर्दानी २
विद्या बालनमिशन मंगल
२०२१तापसी पन्नूथप्पड
दीपिका पदुकोणछपाक
जान्हवी कपूरगुंजन सक्सेना: कारगिल गर्ल
कंगना राणावतपंगा
विद्या बालनशकुंतला देवी
२०२२कृती सेनॉनमिमी
कियारा अडवाणीशेरशाह
परिणीती चोप्रासंदीप आणि पिंकी फरार
तापसी पन्नूरश्मी रॉकेट
विद्या बालनशेरनी
२०२३[]आलिया भट्टगंगूबाई काठियावाडी
भूमी पेडणेकरबधाई दो
जान्हवी कपूरमिली
करीना कपूरलाल सिंग चड्ढा
तब्बूभूल भुलैया २
२०२४[]आलिया भट्टरॉकी और रानी की प्रेम कहानी
भूमी पेडणेकरथॅन्क यू फॉर कमिंग
दीपिका पदुकोणपठाण
कियारा अडवाणीसत्यप्रेम की कथा
राणी मुखर्जीमिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे
तापसी पन्नूडंकी

अनेक पुरस्कार आणि नामांकन

तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार सर्वाधिक असा पाच वेळा मिळाला आहे: नूतन (१९५७, १९६०, १९६४, १९६८ व १९७९), काजोल (१९९६, १९९९, २००२, १००७ व २०११) आणि आलिया भट्ट (२०१७, २०१९, २०२०, २०२३ व २०२४). त्यांच्या खालोखाल तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार चार वेळा मिळाला आहे: मीना कुमारी (१९५४, १९५५, १९६३ व १९६६), माधुरी दिक्षीत (१९९१, १९९३, १९९५ व १९९८) आणि विद्या बालन (२०१०, २०१२, २०१३ व २०१८). लागोपाठ अशे दोन वेळा पुरस्कार मिळवण्यास सहा अभिनेत्रींना यश मिळाले आहे: मीना कुमारी (१९५४-५५), जया बच्चन (१९७४-७५), शबाना आझमी (१९८४-८५), राणी मुखर्जी (२००५-०६), विद्या बालन (२०१२-१३) आणि आलिया भट्ट (२०१९-२० व २०२३-२४). २०२४ मध्ये विजेताहोऊन भट्ट अश्या एकमेव अभिनेत्री झाल्या ज्यानी लागोपाठ दोन वेळा पुरस्कार मिळवला आहे.

माधुरी दिक्षीतला सर्वात जास्त वेळा (१४) नामांकन मिळाले आहे पण फक्त चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल मीना कुमारी आणि विद्या बालन यांना १२ नामांकन आहे; हेमा मालिनी, काजोल व राणी मुखर्जी यांना ११ नामांकन; ऐश्वर्या राय, श्रीदेवीदीपिका पडुकोण यांना १० नामांकन मिळाले आहेत. १९९० च्या दशाकापासून अभिनेत्री तब्बूला सातवेळा नामांकन मिळाले असून एकदाही पुरस्कार मिळाला नाही. १९८४ मध्ये शबाना आझमी यांना एकाच वर्षी असे सर्वाधिक ४ नामांकन मिळाले असून अर्थ चित्रपटातील कामगिरीसाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. तसेच १९६३ मध्ये मीना कुमारी यांना तीन पैकी तीन नामांकन प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये काजोलला देखील तीन नामांकन मिळाले व कुछ कुछ होता है साठी पुरस्कार मिळाला होता. १९८९ ते १९९६ या सात वर्षात सलग अशे १० नामांकन मिळवण्याचा विक्रम माधुरी दिक्षीत यांनी केला आहे.

इतर माहिती

या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २००२ मध्ये त्या दोघी त्यांच्या झुबेदा आणि अशोका चित्रपाटातीला कामांसाठी नामांकीत होत्या. श्रीदेवी आणि जान्हवी कपूर ही एक माय-लेकीची जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी परिणीता वर आधारीत असलेल्या "ललिता" ह्या पात्राच्या अभिनयासाठी मीना कुमार यांना १९५५ चा हा पुरस्कार मिळाला व पुन्हा २००६ मध्ये विद्या बालन यांना नामांकन मिळाले आहे. १९७३ मध्ये पाकीजा चित्रापाटातील भुमीकेसाठी मीना कुमारींना मरणोत्तर नामांकन मिळाले होत. पण मरणोत्तर न देण्याच्या फिल्मफेअरच्या नियमामुळे त्यांना पुरस्कार न देण्याचा निर्णय झाला.[] या श्रेणीतील पुरस्कार कधीही कोणी नाकारला नाही. तथापि, २०२३ मध्ये, त्यांच्या थलायवी चित्रपटासाठी कंगना राणावतने पक्षपाती मतदानाचा फिल्मफेअर पुरस्कारांवर आरोप केला आणि त्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली.[]

संदर्भ

  1. ^ "Best Actress Award (1953-2000)". Official Listings, Indiatimes. 2017-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Nominations for the 68th Hyundai Filmfare Awards 2023 with Maharashtra Tourism". Filmfare. 24 April 2023. 24 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 15 January 2024. 15 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ Reuben, Bunny (2005). ...and Pran: A Biography. HarperCollins and Living Media. p. 266. ISBN 978-81-72234-66-9.
  5. ^ "Filmfare Awards withdraw Kangana Ranaut's nomination after 'false accusations', she says 'see you in court'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-08-21. 2022-10-18 रोजी पाहिले.