फिल्मफेर पुरस्कार
फिल्मफेर पुरस्कार | |
---|---|
प्रयोजन | चित्रपट पुरस्कार |
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
प्रथम पुरस्कार | इ.स. १९५४ |
संकेतस्थळ | http://www.filmfare.com/ |
फिल्मफेर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेर अवॉर्ड्स असे झाले.
१९५६ सालापासून फिल्मफेर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.
पुरस्कार
२०१२ सालापर्यंत एकूण ३७ श्रेण्यांसाठी फिल्मफेर पुरस्कार दिला जात आहे.
मुख्य पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक
- सर्वोत्तम अभिनेता
- सर्वोत्तम अभिनेत्री
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्तम पदार्पण अभिनेता
- सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
- सर्वोत्तम गीतकार
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक
- सर्वोत्तम महिला पार्श्वगायक
समीक्षक पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम अभिनेता
- सर्वोत्तम अभिनेत्री
तांत्रिक पुरस्कार
- सर्वोत्तम कथा
- सर्वोत्तम पटकथा
- सर्वोत्तम संवाद
- सर्वोत्तम ॲक्शन
- सर्वोत्तम कला दिग्दर्शन
- सर्वोत्तम पार्श्वसंगीत
- सर्वोत्तम चलचित्रकला
- सर्वोत्तम संकलन
- सर्वोत्तम नेपथ्य
- सर्वोत्तम ध्वनीमुद्रण
- सर्वोत्तम विशेष परिणाम
- सर्वोत्तम वेषभूषा
विशेष पुरस्कार
- लाइफटाइम अचिव्हमेंट महेश कोठारे (मार्च 2021मध्ये ) फिल्मफेयर अँवार्ड 2020
- विशेष भूमिका
- सर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा]
- नव्या होतकरू संगीतकारासाठी आर.डी. बर्मन पुरस्कार
विक्रम
- एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार
- ब्लॅक (2005) - 11
- दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) - 10
- देवदास (2002) - 10
- सर्वोत्तम अभिनेता
- दिलीप कुमार - 8
- शाहरूख खान - 8
- अमिताभ बच्चन - 8
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
- ए.आर. रहमान - 10
- सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक
- किशोर कुमार - 8
- सर्वोत्तम महिला पार्श्वगायक
- आशा भोसले - 7
- अलका याज्ञिक - 7
- सर्वोत्तम गीतकार
- गुलजार - 10
हे सुद्धा पहा
- मराठी फिल्मफेअर पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण
संदर्भ
बाह्य दुवे
- फिल्मफेअर
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-07-08 at Archive.is
- वर्षानुसार पुरस्कार आय.एम.डी.बी.