Jump to content

फारसी भाषा

फारसी
فارسی, دری
स्थानिक वापरइराण ध्वज इराण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
बहरैन ध्वज बहरैन
इराक ध्वज इराक
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
कुवेत ध्वज कुवेत
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रदेश मध्य-पूर्व, मध्य आशिया
लोकसंख्या ६ - ७ कोटी[]
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीअरबी लिपी (फारसी)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरइराण ध्वज इराण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान (दारी)
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान (ताजिक)
भाषा संकेत
ISO ६३९-१fa
ISO ६३९-२fas
ISO ६३९-३fas[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
फारसी भाषकांचा जगभरातील विस्तार

फारसीपार्शी ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा इराण मध्ये बोलली जाते. फारसी भाषा आधुनिक काळात इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान या देशांची ती अधिकृत भाषा आहे. आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, तुर्कस्तान, उझबेकिस्तान, इराक, पाकिस्तान या देशांतही फारसी जाणणारे लोक आहेत. भारतीय उपखंडात मध्ययुगीन इस्लामी राजवटींच्या काळात फारसीने राजभाषेचे महत्त्व कामवल्यामुळे अनेक भारतीय भाषांवर मध्ययुगीन काळापासून तिचा प्रभाव पडला. काश्मिरी, उर्दू याशिवाय हिंदी आणि मराठीत मूलतः फारसी असलेले अनेक शब्द आढळतात. अमीर खुस्रो, मिर्झा गालिब आणि इक्बाल इत्यादी भारतीय साहित्यात नावाजलेल्या कवींच्या रचना फारसीत आहेत.

उगम व इतिहास

पार्स, फ़ारस या नावाने ओळखली जाणारी जमात इ.स.पू. ५५० ते इ.स. ३३० या काळात भारतीय उपखंडाच्या पश्चिम दिशेस आजच्या इराणापेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा फ़ारसी, ही सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफॉर्म लिपीत लिहिली जाई.

या भाषेचे संस्कृत भाषेशी खूप साम्य आहे. हखामनी भाषेला तिच्या भाषकांचे वास्तव्य असलेल्या अरिया या भागाच्या नावावरून आर्यन भाषा म्हणत. पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरतुष्ट्र या पारशी धर्मसंस्थापकाने याच भाषेत धर्मतत्त्वे सांगितली. इ.स.पू.च्या ४थ्या शतकात महान अलेक्झांडराच्या नेतृत्वाखालील ग्रीक आक्रमणातून आणि नंतर इ.स.च्या ७व्या शतकात झालेल्या अरब आक्रमणातून वाचलेला अवेस्ता हा ग्रंथ अवेस्तान भाषेमध्ये लिहिला गेला होता.

वर्णमाला आणि उच्चार

अवेस्तन ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, आणि थोडे अपवाद वगळता, देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी व परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे. अरब हल्ल्यांनंतर मात्र इस्लाम धर्मासह फारसीभाषकांनी काही अक्षरांची भर घालून अरबी लिपी स्वीकारली.

फारसीतली वर्णमाला

फारसी वर्णवर्णाचे नाववर्णाच्या उच्चाराशी साधर्म्य असलेला मराठीतील उच्चार
اअलीफ"अ"
بबे"ब"
پपे"प"
تते"त"
ثसे"स्स" जिभेचे टोक पुढच्या वरच्या दातांना लावूनस म्हटल्यावर हा उच्चार होतो
جजिम"ज" जेवण मधला ज
چचे"च" चिवडा मधलाच
حहे"ह" हा मधला ह
خखे"ख" खाण्यातला ख
دदॉल"द"
ذझॉल"झ"
رरे"र"
زझ्ये"झ्य" झक्कास मधला झ
ژज्ज"ज" दातांवर दात दाबून ज्य सारखा
سसीन"स"
شशीन"श"
صस्वाद"स"
ضझ्वाद"झ"
طटो"ट"
ظझो"झ"
عऐन"आ"
غगैन"घ"
فफे"फ"
قकाफ"क" हक मधला क
کकाफ"क"
گगाफ"ग"
لलाम"ल"
مमीम"म"
نनून"न"
وवाव"व"
یये"य"
هहे"ह"

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ इराण, ३६ दशलक्ष (५१%) - ४६ दशलक्ष (६५%) Loc.gov, अफगाणिस्तान, १६.३६९ दशलक्ष (५०%), ताजिकिस्तान, ५.७७ दशलक्ष (८०%), उझबेकिस्तान, १.२ दशलक्ष (४.४%)

बाह्य दुवे