फायरफ्लाय
हा लेख मलेशियातील विमानवाहतूक कंपनी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फायरफ्लाय (निःसंदिग्धीकरण).
फायरफ्लाय ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. २००७ साली स्थापन झालेली व पेतालिंग जया ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये मुख्यालय असलेली फायरफ्लाय पूर्णपणे मलेशिया एरलाइन्सच्या मालकीची आहे. फायरफ्लायचे मुख्य वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळ व पेनांग विमानतळ येथे असून जोहोर बारू व कोटा भारू ही तिची प्रमुख शहरे आहेत.
मलेशियाखेरीज इंडोनेशिया, सिंगापूर व थायलंडमधील शहरांना देखील फायरफ्लाय प्रवासी विमानसेवा पुरवते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत