Jump to content

फहमीदा रियाज

फहमीदा रियाज (२३ जुलै, इ.स. १९४६:मेरठ, उत्तर प्रदेश, भारत - ) या एक पाकिस्तानी कवयित्री आहेत.

फहमीदा रियाज यांचे वडील रियाज‍उद्दीन अहमद हे मेरठमध्ये शिक्षणाधिकारी होते. पुढे सिंध प्रांतात बदली झाल्याने ते पाकिस्तानात स्थायिक झाले. फहमीदा चार वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. तिच्या आई हुस्ना बेगम यानी फहमीदांचे शिक्षण चालू ठेवले. तेथेच फहमीदा सिंधी, उर्दू आणि फारसी शिकल्या.

महाविद्यालयात असताना फहमीदा युनिव्हर्सिटी ऑर्डिनन्स व स्टुडन्ट युनियन ट्रस्टच्या बंदीविरुद्ध लिखाण करू लागल्या, भाषणे देऊ लागल्या. त्यानंतर त्यांची ओळख कार्यकर्ती व बंडखोर प्रगतीशील स्त्रीवादी लेखिका म्हणून झाली.

कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर फहमीदा पाकिस्तान रेडियोवर निवेदक म्हणून काम करू लागल्या.

कविता लेखन

फहमीदांची पहिली कविती त्या १५ वर्षांची असताना ’फुनून’ या नामवंत मासिकात प्रसिद्ध झाली. मूळ भारतीय पिंड असल्याने फहमीदा यांच्या कवितांत हिंदी-संस्कृत शब्दांचा भरणा असतो. त्यांच्या कवितांत व गीतांत कृष्ण, गृहिणी, तांडव, द्वार, पांडव, भगवान, भरतनाट्यम, मेघदूत, राजसिंहासन, राम, शाप असले शब्द सापडतात.

पुढे फहमीदा रियाज लंडनला गेल्या. तिथे त्या बीबीसीच्या रेडियोकेंद्रावर नोकरी करू लागल्या.

कराचीला परतल्यानंतर फहमीदा यांनी 'आवाज' नावाचे उर्दू मासिक काढले. याच वेळी त्यांची भेट जफर अली उजान या डाव्या विचारसरणीच्या राजकीय कार्यकर्त्याशी झाली. अन् ते काही काळाने विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली.

'आवाज'मधील उदारमतवादी, राजकीय समीक्षेच्या लिखाणाने पाकिस्तानातील शिया सरकारचे लक्ष वेधले अन् फहमीदा व त्यांचे पती जफर या दोघांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. जफरला कैद झाली. भारतातील मुशायऱ्यांच्या निमंत्रणाची सबब सांगत फहमीदा दिल्लीला मुलांसह पळून आल्या. तुरुंगातून सुटल्यावर त्यांचे पतीही दिल्लीत आले. हे कुटुंब भारताच्या आश्रयाला सात वर्षे होते.

बेनझीर भुत्तो यांच्या विवाहाचे वेळी फहमीदा कराचीला परतल्या. पुढे त्या नॅशनल बँक फाऊंडेशनच्या एम.डी. म्हणून नेमल्या गेल्या. पण पाकिस्तानचे राष्ट्रपती नवाब शेरीफ यांच्या कारकिर्दीत त्यांना भारतीय हेर म्हणून नोकरीवरून काढून टाकले मात्र बेनझीर भुत्तो पुन्हा सत्तेत आल्यावर 'कायदे आजम अकादमी'वर त्यांना उच्चपद देण्यात आले. १२ वर्षे त्या उर्दू डिक्शनरी बोर्डच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या.

फहमीदांचे काव्यसंग्रह

  • कतरा कतरा
  • काफ्ले परिंदों के
  • क्या तुम पूरा चॉंद न देखोगे?
  • खुले दरिचे से
  • धूप
  • पत्थर की जुबां
  • बदनदरिद्रा
  • सूफी संत मौलाना जल्लालुद्दीन रूमींच्या ५० कवितांचा उर्दू अनुवाद
  • हल्का मेरे जंजीर का

फहमीदा रियाज यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या

  • अधुरा आदमी
  • कराची
  • गुलाबी कबूतर
  • गोदावरी
  • ये खाना-ए-आबोगील

फहमीदा यांनी लिहिलेले इंग्रजी प्रबंध

  • पाकिस्तान लिटरेचर ॲन्ड सोसायटी

पुरस्कार

  • पाकिस्तान सरकारचा ’सितारा-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान (२०१०)