फलकमाला
फलकमाला हा प्राचीन भारतीय दागिना आहे.फलकमाला पूर्वी फलकहार म्हणत असे. हा स्त्रिया गळ्यात घालत असत.
स्वरूप
तीन किंवा पाच पदरी. चपट्या आकाराच्या रत्नांचा केलेला हार म्हणजे फलकमाला. ही रत्ने फलकहारात सारख्या अंतरावर बसवलेली असत.[१]
इतिहास
भारतीय हारांतला हा प्राचीन नमुना आहे. मौर्य, आंध्र, शुंग या काळातील शिल्पांत हा पाहायला मिळतो.
मोत्यांचा आकार व संख्या यावरून बहुतेक हाराना नावे दिलेली दिसतात. काही हारांची नावे मध्याभागी असलेल्या मोत्यांवरून दिली जात, उदा शीर्षक, उपशीर्षक, प्रकंडक, अवघटक, तरलप्रतिबंध, इत्यादी. काही नावे हारातील पदरांच्या संख्येवरून आहेत. विजयच्छंद म्हणजे पाचशे पदरी हार. मंदर म्हणजे पाच पदरी होय. फलकहार मंदरमध्ये येतो.[२]