फर्डिनांड दुसरा (पवित्र रोमन सम्राट)
फर्डिनांड दुसरा (९ जुलै १५७८, ग्रात्स – १५ फेब्रुवारी १६३७, व्हियेना) हा १६१७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६१८ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१९ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
कट्टर कॅथलिक विचारांच्या दुसऱ्या फर्डिनांडने युरोपात कॅथलिकचा प्रभाव वाढवण्याचे व प्रोटेस्टंट पंथाचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्याच्या कारकिर्दीदरम्यान तीस वर्षांचे युद्ध घडले.
मागील मॅथ्थियस | पवित्र रोमन सम्राट १६१९-१६३७ | पुढील फर्डिनांड तिसरा |