Jump to content

प.स. देसाई

परशुराम सदाशिव देसाई (जन्म : किंजवडे, देवगड तालुका, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत, २१ मे १८९२; - पुणे, महाराष्ट्र, भारत, २६ एप्रिल १९८२) हे एक मराठी लेखक होते. देसाई तीन वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या २६ वर्षांच्या विधवा विकेशा आईने त्यांचे आणि त्यांच्या दोन भावंडांचे शिक्षण केले.

देसाई १९०७मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी सातवी पास झाले आणि लागलीच नऊ रुपये पगारावर एका खेड्यात शाळामास्तर झाले. नऊ रुपये पगार असला, तरी खाणावळीला १० रुपये द्यावे लागत, म्हणून त्यांनी शिकवण्या केल्या. त्याचवेळी त्यांनी मराठी लेखन सुरू केले. बिहारमधील आरा या संस्थानिकांचे जमीनदार कुॅंवरसिंह आणि त्यांचे छोटे बंधू अमरसिंह यांनी १८५७ सालच्या बंडाचा फायदा घेऊन कंपनी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले होते. या सत्य घटनेवर आधारित ’१८५७चा बंडाचा वणवा’ ही कादंबरी पसंनी लिहिली.

साहित्य

१९२२मध्ये प.स. देसाई त्यांनी माझी ओळख या नावाची छोटी पुस्तिका प्रकाशित केली. तीत त्यांनी त्या वर्षापर्यंत मासिकांतून १४ व वर्तमानपत्रांतून ११ लेख प्रकाशित झाल्याचे लिहिले आहे.

पुस्तके

  • १८५७चा बंडाचा वणवा (कादंबरी)
  • गृहलक्ष्मी (१९१५मध्ये ‘सरस वाङ्मय रत्नमाला’ या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली देसाई यांची पहिली कादंबरी)
  • चारुगात्री अथवा आंग्ल सत्तेचा उदयकाळ (१९२०)
  • ताजमहाल (कादंबरी, १९१६)
  • पत्नीव्रताची कसोटी (कादंबरी, १९२१)
  • पातिव्रत्याची कसोटी (१९१९)
  • प्रेमळ सवत (कादंबरी, १९१७)
  • यात्रिक (कादंबरी, १९६४)
  • सौभाग्यतिलक (कादंबरी, १९१८)