Jump to content

प्रीमियर हॉकी लीग

प्रीमियर हॉकी लीग
PHLLogo.jpeg
खेळहॉकी
प्रारंभ२००५
ब्रीदवाक्य गर्व नही तो कुछ नही!
वर्षे
संघ
देशभारत
सद्य विजेता संघ बंगलोर हाय फ्लायर्स
संकेतस्थळप्रीमियर हॉकी लीग
प्रीमियर हॉकी लीग २००८


प्रीमियर हॉकी लीग (इंग्रजी:Premier Hockey League) किंवा पी.एच.एल. भारतातील हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००५ सालापासून खेळवली जात आहे. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटची लोकप्रियता व भारतीय हॉकी संघाच्या सुमार प्रदर्शनामुळे प्रेक्षक हॉकीपासून दूर गेला. भारतात हॉकी परत एकदा लोकप्रिय करण्यासाठी, भारतीय हॉकी संघटनेने (IHF) ही लीग सुरू केली.

२००७ मध्ये ही स्पर्धा चेन्नई व चंदीगड येथे होत आहे. प्रीमियर हॉकी लीगचे सर्व सामने ई.एस.पी.एन. वाहिनीवर दाखविले जातात.

नवीन नियम

आंतरराष्ट्रीय हॉकी सामना ७० मिनिटांचा असतो व ३५ मिनिटांच्या दोन भागात विभागला जातो. मात्र पी.एच.एल. मध्ये ७० मिनिटे चार भागात विभागलेले आहेत (एक भाग १७.५ मिनिटे). ह्याशिवाय फिरते बदल ( Rolling Substitution), टाइम आउट ( Time Out) असे नावीन्यपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत.

प्रीमियर हॉकी लीग हंगाम

वर्ष यजमान शहर विजेता उप विजेता
२००५
माहिती
हैद्राबाद हैद्राबाद सुल्तान्स शेर-ए-जालंदर
२००६
माहिती
चंदीगड बंगलोर हाय फ्लायर्स चंदिगड डायनामोज
२००७
माहिती
चेन्नई व चंदीगड ओरिसा स्टीलर्स शेर-ए-जालंदर
२००८
माहिती
चंदीगड बंगलोर हाय फ्लायर्स चंदिगड डायनामोज

संघांची कामगिरी

संघ सहभाग सलग सहभाग पदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम प्रदर्शन माहिती
सामने विजय हार
बंगलोर हाय फ्लायर्स२००५२००८विजेता (२००६,२००८)261511
हैद्राबाद सुल्तान्स२००५२००८विजेता (२००५)261214
ओरिसा स्टीलर्स२००७२००८विजेता (२००७)21156
शेर-ए-जालंदर२००५२००८उप विजेता (२००५,२००७)291514
चंदिगड डायनामोज२००६२००८उप विजेता (२००६,२००८)261511
मराठा वॉरियर्स२००५२००८261313
चेन्नई वीरन्स२००५२००८26620
संघ २००५२००६२००७२००८
प्रीमियर लीग
हैद्राबाद सुल्तान्सविजेता
बंगलोर हाय फ्लायर्सविजेताविजेता
ओरिसा स्टीलर्सnaविजेता
शेर-ए-जालंदरउप विजेताउप विजेता
चंदिगड डायनामोजnaउप विजेताउप विजेता
मराठा वॉरियर्स
चेन्नई वीरन्स
फर्स्ट डिविजन
चंदिगड डायनामोजविजेताna
ओरिसा स्टीलर्सaविजेता
चेन्नई वीरन्सaविजेता
लखन्नो नवाब्जnana
दिल्ली डॅझलर्सउप विजेता
इंफाळ रेंजर्सnana

संघ

  • हैद्राबाद सुल्तान्स
  • शेर-ए-जालंदर
  • मराठा वॉरीएर्स
  • बंगलोर लायन्स
  • चंदिगड डायनामोज
  • चेन्नै विरन्स
  • ओडिशा स्टीलर्स
  • दिल्ली डॅझलर्स
  • बेंगाल टायगर्स
  • लखनौ नवाब्ज
  • इंफाळ रेंजर्स

आंतरराष्ट्रीय खेळाडू

पी.एच.एल.(प्रीमियर हॉकी लीग)मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सामील होतात. पाकिस्तान, नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू पी.एच.एल मधे सहभागी झाले आहेत. २००७ मध्ये खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू:

  • सेबॅस्टियन वेस्टरहॉट (नेदरलन्ड्स, सुल्तान्स)
  • शकील अब्बासी (पाकिस्तान, सुल्तान्स)
  • तारिक अजीज (पाकिस्तान, सुल्तान्स)
  • डॉन प्रिन्स (नेदरलन्ड्स, शेर्स)
  • मोहम्मद इम्रान (पाकिस्तान, शेर्स)
  • इम्रान खान (पाकिस्तान, शेर्स)
  • सेस्को वॅन डर विलेट (नेदरलॅन्ड्स, वॉरियर्स)
  • अदनान मकसुद (पाकिस्तान, वॉरियर्स)
  • इम्रान वारसी (पाकिस्तान, वॉरियर्स)
  • जेमी डॉयर (ऑस्ट्रेलिया, वॉरियर्स)
  • सॅन्डर वॅन डे विडे (नेदरलॅन्ड्स, लॉयन्स)
  • रेहान भट्ट (पाकिस्तान,लॉयन्स)
  • बाल्देर बोमन्स (नेदरलॅन्ड्स, डायनामोज)
  • सज्जाद अन्वर (पाकिस्तान , डायनामोज)
  • टिमो ब्रुइन्समा (नेदरलॅन्ड्स, डायनामोज)
  • अल्बर्ट सेसास (स्पेन, विरन्स)
  • कुहान शण्मुखनाथन (मलेशिया, विरन्स)
  • मुहम्मद झुबेर (पाकिस्तान, विरन्स)
  • तिजार्ड स्टेलर (नेदर्लॅन्ड्स, स्टीलर्स)
  • सलमान अकबर (पाकिस्तान, स्टीलर्स)
  • अदनान झाकिर (पाकिस्तान, स्टीलर्स)

प्रीमियर हॉकी लीग २००५

२००५ साली हैद्राबादमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रीमियर लीग व फर्स्ट डिविजन ह्या दोन विभागात ही स्पर्धा झाली.

प्रीमियर लीग फर्स्ट डिविजन
  • बेंगाल टायगर्स
  • लखन्नो नवाब्ज
  • दिल्ली डॅझलर्स
  • चंदिगड डायनामोज ( विजेता) ( २००६ - प्रीमियर लीग)

  • इंफाळ रेंजर्स

प्रीमियर हॉकी लीग २००६

प्रीमियर लीग फर्स्ट डिविजन

प्रीमियर हॉकी लीग २००७

२००७ साली फक्त प्रीमियर लीग खेळवण्यात येत आहे. सात संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चेन्नई व चंदिगड येथे होईल.

संघ सामनेविजयहारगोल केलेगोल झालेगुणश्रेणी
ओरिसा स्टीलर्स ( विजेता) १२१०२९१२२८
शेर-ए-जालंदर१२२८१४२३
बंगलोर हाय फ्लायर्स१२२४२६२०
मराठा वॉरियर्स१२१९२०१९
चंदिगड डायनामोज१२१८१७१७
चेन्नई वीरन्स१२१८३२१३
हैद्राबाद सुल्तान्स१२१०११२६

विजेता संघ - ओडिशा स्टीलर्स (४० लाख रुपये )

उप-विजेता संघ - शेर-ए-जालंदर(१५ लाख रुपये )

मॅन ऑफ़ टुर्नामेंन्ट - गगन अजित सिंग (शेर्स)

फ़ेअर प्ले - बंगलोर लायन्स

साखळी सामन्यांच्या अंती ओडिशा स्टीलर्स व शेर-ए-जालंदर यांच्यातील बेस्ट ऑफ़ थ्री फ़ायनल्स मधुन विजेता संघ निवडण्यात आला.

तिसया अंतिम सामन्यात पंच्याशी केलेल्या गैर वर्तनामुळे शेर-ए-जालंदरच्या संघाला विजयी रकमेच्या ५० % दंड ठोकवण्यात आला. भारतीय हॉकी महासंघाने ह्या घटनेत सहभागी असलेल्या खेळाडुंची चौकशी सुरू केलेली आहे.

यशस्वी झालेली ही स्पर्धा खूप लांब (४ जानेवारी २००७ ते ५ मार्च २००७) असल्याचे बरयाच परदेशी खेळाडुंनी सांगितले.

बाह्य दुवे

प्रीमियर हॉकी लीग २००८
ओरिसा स्टीलर्स | शेर-ए-जालंदर | बंगलोर हाय फ्लायर्स | मराठा वॉरियर्स | चंदिगड डायनामोज | चेन्नई विरन्स | हैद्राबाद सुल्तान्स
संघ | अंतिम सामना | विक्रम
२००५ | २००६ | २००७ | २००८