प्रीतिलता वड्डेदार
भारतीय महिला स्वातंत्र्यवीर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | প্রীতিলতা ওয়াদ্দেদার | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे ५, इ.स. १९११, इ.स. १९११ चट्टग्राम | ||
मृत्यू तारीख | सप्टेंबर २३, इ.स. १९३२, इ.स. १९३२ चट्टग्राम | ||
मृत्युची पद्धत | |||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
चळवळ | |||
| |||
प्रीतिलता वड्डेदार (५ मे, १९११ – २३ सप्टेंबर, १९३२) या एक भारतीय महिला क्रांतिकारक होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगांव जवळील ढोलघाट या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.
सुरुवातीचे जीवन
पुराणातील दुर्गा, इतिहासातील जिजाबाई, राणी पद्मिनी, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई इत्यादी वीरांगनांच्या गोष्टी एेकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.
इ.स. १९२७ मध्ये त्या विषेश प्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याला काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. काॅलेजमध्ये असतानाच त्यांनी कल्पना दत्त, कमला मुखर्जी, रेणू रे या मैत्रिणींसह हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले. इ.स. १९३० साली त्या बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
क्रांतिकार्य
ढोलघाटला परत आल्यावर प्रीतिलतांनी 'नंदनकानन' शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमधील त्यांचे सहकारी सूर्यसेन यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. ४ सप्टेंबर १९३२ला रात्री ९.३० वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकाऱ्यांनी पहाडतळी रेल्वे स्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी १५ अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले.