प्राची गर्ग
प्राची गर्ग (१९ मे, १९८४ - ) एक लेखिका, स्तंभलेखिका, वक्त्या आणि उद्योजक आहेत. त्यांनी सुपरवुमन आणि सुपरकपल्स ही पुस्तके लिहिली आहेत.[१] त्या भारतीय उपखंडाच्या संदर्भात उद्योजकता, सामाजिक समस्या आणि विकास आणि महिला सक्षमीकरणा बद्दल लिहतात.[२]
जीवन
प्राची गर्ग यांचा जन्म १९ मे १९८४ रोजी बुलंदशहर, उत्तर प्रदेश येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. त्या नीरू गर्ग आणि ब्रजेश गर्ग यांची कन्या आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
कारकीर्द
डीडी न्यूझ जर्नलमध्ये अँकर आणि बातमीदार म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच EET India सह फ्रीलान्स पत्रकार आणि HT Horizons साठी फ्रीलान्सिंग केले आहे.[३]
त्या घूमोफिरो या उद्योगाच्या मालकीण आहेत.[४] इंडियन एक्सप्रेस फेमिना, iDiva द्वारे त्यांच्या उद्योगाविषयी बातम्या कव्हर झाल्या आहेत. तसेच त्या महिलांच्या मार्गदर्शनाने सहलीचे देखील आयोजन करतात.[५]
पुरस्कार
इकॉनॉमिक टाइम्स कडून त्यांना "तंत्रज्ञान आणि उद्योजक साहित्यासाठी ET प्रेरणादायी नेता पुरस्कार" 2021 प्राप्त झाला.[६]
संदर्भ
- ^ May 3, Kratagya Rathore / TNN / Updated:; 2018; Ist, 19:38. "Shatrujeet Nath: Indore experiences a great mix of literature and arts | Indore News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-03-10 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "IIM Trichy hosts lecture on challenges faced by women entrepreneurs".
- ^ "The downside of winning - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-03-10 रोजी पाहिले.
- ^ "Open letter to Indian parents to let their kids travel".
- ^ "GhoomPiro Sisters Giving Women Guided Tours Of India". NowThis News (इंग्रजी भाषेत). 2020-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-10 रोजी पाहिले.
- ^ "ET Inspiring Leaders by OMS is celebrating and recognising the excellence of these amazing Leaders - Times of India". The Times of India. 2022-03-10 रोजी पाहिले.