Jump to content

प्राचीन रोम

इ.स.पू. ५१० ते इ.स. ४८० दरम्यान रोमन प्रदेश:
  पश्चिम रोमन साम्राज्य

प्राचीन रोम (लॅटिन: Roma antiqua) ही आजच्या इटलीमधील रोम शहर केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली एक ऐतिहासिक सभ्यता होती. भूमध्य समुद्रालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने दक्षिण युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, अनातोलिया इत्यादी भागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्राचीन ग्रीस सोबत रोमचा ग्रीको-रोमन विश्व असा उल्लेख केला जातो.

कला, साहित्य, भाषा, वास्तूशास्त्र, राजकारण, लष्कर इत्यादी अनेक विषयांवर प्राचीन रोमन समाजाचे योगदान अमुल्य मानले जाते. चिचेरो, होरेस, व्हर्जिल, ऑगस्टस इत्यादी रोमन व्यक्ती आजही स्मरणात आहेत.


बाह्य दुवे