प्रांजल पाटील
प्रांजल पाटील (जन्म: १ एप्रिल १९८८) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन आय.ए.एस. अधिकारी आहेत. २०१७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चर्चेत आल्या.[१][२][३]
संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये त्यांचा ७७३ वा गुणानुक्रमांक आला.[४] यामध्ये त्यांची रेल्वे सेवेत निवड झाली होती. पाटील यांनी पुढील वर्षी (२०१७) पुन्हा परीक्षा देऊन संपूर्ण भारतातील १२४ व्या क्रमांकासह भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) त्यांची निवड झाली.[५][६]
जीवन
प्रांजल यांचे मूळ गाव भुसावळ तालुक्यातील आहे. पण त्यांचे कुटुंब अनेक वर्षे उल्हासनगर येथे राहते. लहानपणी खेळत असताना पाटील यांच्या डोळ्याला इजा झाली आणि त्यामध्येच सहाव्या वर्षी त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. पुढे एका आजारपणात दुसऱ्याही डोळ्याला अंधत्व आले.[१][७][८]
पाटील यांनी दादरच्या कमला मेहता अंधशाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर बारावीचे शिक्षण चांदिबाई महाविद्यालयातून घेतले. पुढे त्यांनी सेंट झेविअर्स महाविद्यालयात कला शाखेतून राज्यशास्त्रातील पदवी घेतली. नवी दिल्लीतील जेएनयू येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. लोकसेवा आयोगाच्या तयारीसोबत त्यांनी पीएच.डी.चीही तयारी सुरू ठेवली.[५][९]
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "प्रांजल पाटील : नेत्रहीन विद्यार्थिनी ते IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवाास". BBC News मराठी. 2018-06-19. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "सहाव्या वर्षी दृष्टी गेली, IAS अधिकारी बनली!". Maharashtra Times. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "Meet Pranjal Patil, country's first visually challenged woman IAS officer, who cracked UPSC without coaching". www.dnaindia.com. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "IAS Officer: Pranjal Patil, first visually impaired women IAS officer takes charge as Sub-Collector of Thiruvananthapuram | Education News". www.timesnownews.com. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ a b "प्रांजली पाटील". Loksatta. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "UPSC: बचपन से नेत्रहीन प्रांजल ने बिना कोचिंग के पास किया यूपीएससी एग्जाम". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "Success Story: अवघ्या 7 वर्षाच्या वयात झाली दृष्टिहीन; ब्रेल लिपित अभ्यास करून झाली देशाची पहिली नेत्रहीन महिला IAS". News18 Lokmat. 2021-09-16. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-02 रोजी पाहिले.
- ^ "नेत्रहीन IAS अधिकारी प्रांजल पाटील यांनी सांभाळला पदभार | first visually challenged woman IAS officer Pranjal Patil takes over as SubCollector of Thiruvananthapuram". zeenews.india.com. 2022-03-02 रोजी पाहिले.