प्रवीण निकम
प्रविण निकम हे महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१][२] प्रविण निकम हे मूळचे सातारा जिल्हातील असून ते पुणे येथे समता सेंटर नावाची सामाजिक संस्था चालवतात.[३]
बालपण आणि शिक्षण
प्रविण यांचा जन्म सातारा जिल्हात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावी झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने परिवार पुण्याला स्थलांतरित झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण पुण्यात झाले. पुण्यात सर परशुराम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.
प्रविण यांनी लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठातून मानवी हक्क आणि राजकारण या विषयात चिविंग शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं आहे.[४]
सामाजिक कार्य
रोशनी संस्था
प्रविण यांनी २०११ साली महिलांच्या मासिक पाळी संदर्भात जनजागृती करण्यासाठी रोशनी संस्थेची सुरुवात केली. 'रोशनी'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी झोपडपट्टीतील महिलांमध्ये त्यांनी काम केले. [५]
समता केंद्र
समता केंद्र संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि वंचित परिवारातील युवकांना उच्च शिक्षणासाठी मदत मिळवून देण्याच काम केले जात आहे. समता केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांना याचा फायदा झाला आहे.[२]
लेखन
परदेशी शिकताना[६] उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शनपर सकाळ वर्तमानपत्रात साप्ताहिक सदर
सन्मान आणि नामांकने
- केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार[७] २०१४[८]
- यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार[२]
- Chevening Volunteer Award[९]
- British Council NISAU India UK Young Achivers
संदर्भ
- ^ "Break the silence on menstruation taboos: Pune student to men". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-11-25. 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ a b c Suryawanshi, Sudhir (2023-03-12). "Man and his motto: Let the crowd follow you". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ माझा, निलेश बुधावले, एबीपी (2023-01-27). "महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, साताऱ्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान". marathi.abplive.com. 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Catching up with Pravin Nikam". LSE Careers blog. 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Yourstory". Your Story. 20.
|date=, |archive-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ वृत्तसेवा, सकाळ (2023-05-31). "परदेशी शिकताना : केंब्रिज विद्यापीठातील संधी". Marathi News Esakal. 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Pune boy to get National Youth Award; only one from Maharashtra this year". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-01-12. 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ News, Vsrs (2024-01-10). "प्रधानमंत्री के राष्ट्रीय युवा पुरस्कार कार्यक्रम में अमित गोरखे,प्रविण निकम विशेष निमंत्रित". Hindi e news Paper Online | Latest News Hindi | VSRS News (इंग्रजी भाषेत). 2024-06-07 रोजी पाहिले.
- ^ Bureau, PuneMirror (2021-11-24). "Pune Youth Makes India Proud". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2024-06-07 रोजी पाहिले.