Jump to content

प्रल्हाद लुलेकर

डॉ. प्रल्हाद लुलेकर
चित्र:Dr.Pralhad Lulekar1.jpg
डॉ. प्रल्हाद लुलेकर
जन्म नाव प्रल्हाद गोविंदराव लुलेकर
जन्म ३ मार्च, १९५४ (1954-03-03) (वय: ७०)
सुखापुरी अंबड जालना
शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन, संशोधन , प्रभावी वक्ता
भाषा मराठी
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले
आई गंगाबाई
पत्नी सुशीला लुलेकर
अपत्ये कविता, शीतल, प्रवीण
पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार (महाराष्ट्र शासन) इ.स. २००९

डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर (३ मार्च इ.स. १९५४) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील माजी मराठी विभाग प्रमुख, माजी परीक्षा नियंत्रक, लेखक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व व्याख्याते आहेत.[]

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

डॉ. लुलेकर यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली व दुसरी सिरसगाव येथे तर इयत्ता तिसरी ते सातवी खांडवी येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवी ते दहावी सातोना येथे झाले. लुलेकर यांनी के.के.एम. महाविद्यालय मानवत येथे वसतिगृहात राहून बी.ए. पूर्ण केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मार्च इ.स. १९७७ मध्ये एम.ए. (मराठी) ही पदवी सर्वद्वितीय प्रथम श्रेणीत मिळवली. सन नोव्हेंबर १९९८ मध्ये वेदनांचा प्रदेश संशोधन ग्रंथ लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.

अनुभव आणि कारकीर्द

  • व्याख्याता : कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अंबड जि. जालना इ.स. १९७७ ते इ.स. १९८१.
  • अधिव्याख्याता : कला व वाणिज्य महाविद्यालय अंबड जि. जालना इ.स. १९८१ ते इ.स. १९९२
  • प्राचार्य : श्री आसाराम भांडवलदार महाविद्यालय, देवगांव (रंगारी) ता. कन्नड जि.औरंगाबाद महाविद्यालयात इ.स. २००१ ते इ.स. २००३.
  • प्राध्यापक : मराठी विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद डिसेंबर २००५ ते जून २०१६

प्रशासकीय अनुभव

  • साहाय्यक कुलसचिव (परीक्षा) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९९२ ते इ.स. १९९७.
  • उपकुलसचिव(परीक्षा पदव्युत्तर, सांख्यिकी आणि नियोजन, शैक्षणिक) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९९७ ते २००१ आणि २००३ ते २००५.
  • मराठी विभाग प्रमुख : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. २००६ ते इ.स. २००९ आणि इ.स. २०१० ते इ.स. २०११
  • परीक्षा नियंत्रक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जून २०१५ ते मार्च २०१६.
  • डॉ.लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट व २० विद्यार्थ्यांना एम.फिल. प्रदान करण्यात आली आहे.[]

लेखन आणि साहित्य

ग्रंथ संपदा
अ.क्रपुस्तकाचे नावसाहित्य प्रकारप्रकाशन तथा विशेष
आले ढग...गेले ढगकाव्यसंग्रहनाथ पब्लिकेशन्स औरंगाबाद इ.स.
मोगडावैचारिकसाहित्यसेवा प्रकाशन औंगाबाद इ.स. १९९७
बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुलेवैचारिकअक्षर वाङ्मय प्रकाशन , पुणे नोव्हेंबर २०१९
पंचधारांचा प्रदेशवैचारिकचिन्मय प्रकाशन, औरंगाबाद १७ सप्टेंबर इ.स. २००४
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा- दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरवैचारिक साहित्यसायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे प्रथम आवृत्ती २०११,द्वितीय -२०१२ तृतीय- २०१४ , चतुर्थ- २०१५
बलुतेदारसमाजचिंतनसंवेदना प्रकाशन, औरंगाबाद, ६ डिसेंबर इ.स. १९९५
गावगाड्याचे शिल्पकारकला कौशल्य, माहितीपर, सामाजिकस्वरूप प्रकाशन, औरंगाबाद १५ ऑगस्ट २००९
वेध आणि वेधकसमीक्षाकैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, फेब्रुवारी १९८८
प्रतिभेचे प्रदेशसमीक्षाकैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, जानेवारी २००३
१०भूमिकांचा ऐवजसमीक्षाविद्या बुक पब्लिशर्स प्रकाशन वर्ष सन २०२० []
११साहित्याचे वर्तन आणि वर्तमानसमीक्षासाकेत प्रकाशन, औरंगाबाद इ.स. २००८
१२भंजनाचे भंजनसाहित्य आणि समीक्षा१९९८ साकेत प्रकाशन
१३साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग - १लेखसायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे इ.स. २०१४
१४साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग - २लेखसायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे इ.स. २०१४ []
१५व्याकरण आणि लेखनसहलेखन(सहलेखक- डॉ. गोवर्धन मुळक) कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, ऑगस्ट १९९४
१६साहित्याचे सांस्कृतिक संचितसहलेखन(सहलेखक- डॉ. केशव तुपे) कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, नोव्हेंबर २००५
१७अनिवार्य मराठी: व्याकरण लेखन आणि आकलनसहलेखन(सहलेखक- डॉ. केदार काळवणे) पिअर्सन प्रकाशन, दिल्ली २०१२,२०१३
१८वेदनांचे प्रदेशसंशोधनकैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, मार्च २०००
१९बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारेसंशोधन१९९८ पद्मगंधा प्रकाशन पुणे २१ मार्च २०१५ [][]
२०जास्वंदसंपादनमराठवाड्यातील महाविद्यालयीन विध्यार्थ्यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह इ.स. १९७४
२१शेतकऱ्याचा असूडसंपादनविद्या बुक पब्लिशर्स प्रकाशन वर्ष सन २०१९ []
२२युवाकंपसंपादनबाबा आमटे विशेषांक इ.स. १९८१
२३युवाकंपसंपादननरहर कुरुंदकर विशेषांक इ.स. १९८४
२४जातक (प्रा. दत्ता भगत गौरवग्रंथ)संपादनकैलाश पब्लिकेशन्स औरंगाबाद,जुलै २००५
२५सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक( म.जोतीराव फुलेसंपादनकैलाश पब्लिकेशन्स औरंगाबाद,१८ जुलै २००८
२६दुःखाविषयी निबंध (मुक्ता साळवे यांचा निबंध)संपादनचिन्मय प्रकाशन औरंगाबाद २००६
२७मराठवाड्यातील साहित्यसंपादनकैलास पब्लिकेशन्स औरंगाबाद १७ सप्टेंबर २००७
२८निवडक उत्तम कांबळेसंपादनकैलास पब्लिकेशन्स औरंगाबाद, डिसेंबर २०१०
२९आस्वाद आणि समीक्षा (प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निवडक प्रस्तावना)संपादनस्वरूप प्रकाशन औरंगाबाद १९ फेब्रुवारी २०१४
३०गैर-दलितों के भी उद्धारक बाबासाहेब डॉ. आंबेडकर (अनुवाद: डॉ. सुर्यनारायण रणसुभे)अनुवादसम्यक प्रकाशन दिल्ली, २०१३
३१जास्वंदाची फुले प्रा.लुलेकर व्यक्ती आणि साहित्यव्यक्तित्व परिचयचिन्मय प्रकाशन औरंगाबाद ३ मार्च २०१६ []

३२ बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले ... अक्षर वाङ्मय , पुणे .. नोव्हेंबर २०१९

३३ . भूमिकांचा ऐवज .. समीक्षा.. विद्या बुक्स पब्लिशर्स , औरंगाबाद .. जानेवारी २०२०

३४ शेतक-याचा असूड .. संपादन .. विद्या बुक्स पब्लिशर्स , औरंगाबाद .. २०१९

संशोधन प्रकल्प

विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रायोजित केलेल्या बृहत संशोधन प्रकल्प

  1. बलुतेदारांच्या हत्यारांचा आणि अवजारांचा भाषाशास्त्रीय अभ्यास’ हा बृहत संशोधन प्रकल्प पूर्ण १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१०
  2. मराठवाडा: इतिहास, साहित्य आणि संस्कृती’ हा बृहत संशोधन प्रकल्प पूर्ण १ एप्रिल १०१३ ते ३० सप्टेंबर २०१५

पुरस्कार

  1. ”वेध आणि वेधक” या समीक्षा ग्रंथाला महात्मा फुले पुरस्कार इ.स. १९९३
  2. ‘बलुतेदार’ या समाजचिंतनपर ग्रंथाला विश्वकर्मा पुरस्कार इ.स. १९९६
  3. ’मोगडा’ या वैचारिक ग्रंथाला लोकपीठ पुरस्कार इ.स. २००४
  4. ’आले ढग...गेले ढग’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार इ.स. १९९८-१९९९
  5. ’प्रतिभेचे प्रदेश’ या समीक्षा ग्रंथाला अविष्कार साहित्य मंडळ नांदेड यांचा कवी भारत भूषण पुरस्कार नोव्हेंबर २००३
  6. पंचाधारांचा प्रदेश’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा वा.ल.कुलकर्णी समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र पुरस्कार इ.स. २००४ -०५
  7. बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे या संशोधनपर ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार इ.स. २०१६
  8. औरंगाबाद महानगरपालिकेकडून गुणवंत नागरिक पुरस्कार इ.स. १९९९
  9. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती औरंगाबाद इ.स. २००७
  10. अंबड गौरव पुरस्कार शहीद भगतसिंग गणेश मंडळ अंबड इ.स. २०१२
  11. अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्कार, साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे कला अकादमी व संशोधन केंद्र लातूर २०१४
  12. कै. नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार, कै. नरहर कुरुंदकर स्मृती संस्था अंबाजोगाई इ.स. २०१६
  13. महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे यांचा साहित्य पुरस्कार २०१६
  14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार (महाराष्ट्र शासन) इ.स. २००९
  15.  नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार[]

सन्मान

  1. अध्यक्ष : नववे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, मरडसगाव जि.परभणी
  2. अध्यक्ष : अविष्कार साहित्य समेलन, परतूर जि. जालना
  3. अध्यक्ष : पहिले मराठवाडा युवा साहित्य समेलन, औरंगाबाद(आयोजक :- कैलास पब्लिकेशन्स व म.सा.प. औरंगाबाद)
  4. अध्यक्ष :१८ वे नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य समेलन, नांदेड (आयोजन- अविष्कार साहित्य मंडळ ,नांदेड)
  5. अध्यक्ष : दुसरे मराठी साहित्य समेलन, शिरूर अनंतपाळ जि. लातूर (आयोजक :- मराठी साहित्य सेवा मंडळ)
  6. अध्यक्ष : १४ वे विद्रोही साहित्य संमेलन , हिंगोली मार्च २०१६

विद्यापीठीय अधिकार मंडळे व विविध समित्या

  1. सदस्य : विद्या परिषद, २००१ ते २००३, जून २०१५ ते मार्च २०१६
  2. सदस्य : ग्रंथालय समिती, २००६ ते २००९
  3. सदस्य :कमवा व शिका, विद्यार्थी निवड समिती, २००५ -२००७
  4. सदस्य : विद्यार्थी सहाय्य निधी समिती, २००५ -२००७
  5. सदस्य : विद्यापीठ अध्यापन आणि संशोधन मंडळ २००६ -२००९ व २०१० ते २०११
  6. सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती इ.स. २००६ ते २००९ व २०१० ते २०११
  7. सदस्य : विद्यापीठ सुवर्ण महोत्सव समिती २००७ ते २००८
  8. सदस्य : मराठी अभ्यास मंडळ २००६ ते २००९ आणि २०१० ते २०११
  9. सदस्य : व्यवस्थापन परिषद जून २०१५ ते मार्च २०१६
  10. सदस्य सचिव : परीक्षा मंडळ  जून २०१५ ते मार्च २०१६
  11. सदस्य : विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या आणि अधिव्याख्यात्यांच्या निवड समितीवर माननीय कुलगुरू यांचे प्रतिनिधी आणि विषयतज्ज्ञ
  12. सदस्य : प्राचार्य संघटना कार्यकारिणी
  13. अध्यक्ष : विद्यापीठ संलग्नीकरण समिती
  14. सदस्य सचिव : शिक्षकांच्या नियत वयोमान वाढीसंदर्भात गठीत समिती (६० वरून ६२ करण्यासंदर्भात) पडताळणी समिती.

अन्य विद्यापीठीय समितीत सहभाग

  1. सदस्य : मराठी अभ्यास मंडळ, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा
  2. सदस्य : मराठी अभ्यास मंडळ, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड
  3. सदस्य :भाषा विद्याशाखा,  महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा
  4. सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
  5. सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

शासकीय समित्यांचे सदस्य

  1. सदस्य सचिव : बी.एड. प्रवेश समिती इ.स. २००१
  2. सदस्य : पुनःसंपादन मंडळ (कुमारभारती इ.१० वी आणि युवभारती इ.१२ वी मराठी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे २००७
  3. सदस्य : अभ्यास मंडळ (कुमारभारती इ.१० वी आणि युवभारती इ.१२ वी मराठी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे २००७ ते २००९
  4. सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य, सन २०११ ते २०१५

अभ्यासक्रमात लेखांचा समावेश

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. मराठी प्रथम वर्गासाठी “प्रतिभेचे प्रदेश’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश
  2. साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह : दलित साहित्य या अभ्यासपत्रिकेसाठी “वेदनांचे प्रदेश’’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी. कॉम, बी.एस्सी., दुसऱ्या वर्षाच्या द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमात संपादित ग्रंथ “साहित्य लेणी” यातील “व्यावसायिक कोंडी” या बलुतेदार या पुस्तकातील लेखाचा समावेश.
  4. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे एम.ए.च्या अभ्यासक्रमात “अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा क्रमिक पुस्तक म्हणून समावेश
  5. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी. कॉम, बी.एस्सी.च्या वर्गांच्या दुसऱ्या वर्षाच्या द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमात ‘कासीम रझवीशी बातचीत’ या कवितेचा समावेश.
  6. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाच्या एम.ए (मराठी )च्या अभ्यासक्रमात ' अनंत पैलूंचा सामाजिक यौद्धा: दलितेतरांसाठी . डॉ . बाबासाहेब आंबेडकर ' या ग्रंथाचा समावेश
  7. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाच्या बी . कॉम . (द्वितीय वर्ष ) द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमात लेख समाविष्ट

प्रशासकीय कारकीर्द

१.परीक्षा विभागामध्ये सहाय्यक कुलसचिव व उपकुलसचिव म्हणून काम पहिले.
२.सन १९९३ साली 'जिल्हा केंद्रीय मूल्यांकन' पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रात प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात करण्यात आला. त्याची संकल्पना, प्रत्यक्ष कार्यवाही केली.
३.विद्यार्थ्यांचे विद्याशाखानिहाय व महाविद्यालय निहाय बैठक क्रमांकाची नवी पद्धती तयार केली.
४.उत्तरपत्रिकांच्या पानांची संख्या ३२ पानांची करण्याची कल्पना प्रथम विद्यापीठात मांडून, संबंधित अधिकार मंडळाची मान्यता घेण्यात पुढाकार घेतला.
५. पदव्युत्तर विभागात काम करताना विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका या विद्यापीठात प्रथमच प्रसिद्ध केली.
६. पद्मश्री डॉ . यु . म . पठाण आणि सहकारी यांनी जमा केलेल्या साधारण ४ लाख पाने असलेल्या विविध हस्तलिखिते आणि पोथ्यांचे स्कॅनिंग करून सी.डी. तयार करण्याचे काम विभागप्रमुख या नात्याने हाती घेतले . पैकी १.५ लाख पानांचे काम पूर्ण केले.
७.परीक्षेचे निर्धारित वेळापत्रक शैक्षणिक सत्र सुरू होतानाच देण्यात आले.ही पद्धती सुरू करताना पुढाकार घेतला .

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "'पत्रकारांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन लढण्याची गरज'". Eenadu English Portal. 2018-06-18 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ जास्वंदाची फुले : प्रल्हाद लुलेकर : व्यक्ती आणि साहित्य. औरंगाबाद: चिन्मय प्रकाशन. ३ मार्च २०१६. pp. २९० ते २९३.
  3. ^ "Bhumikancha Evaje - Pralhad Lulekar - भूमिकांचा ऐवज - मराठी विषय". Vidya Books (इंग्रजी भाषेत). 2020-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-25 रोजी पाहिले.
  4. ^ "Books". www.bookganga.com. 2018-06-11 रोजी पाहिले.
  5. ^ "मराठी पुस्तक बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे, marathi book balutedArAMchI hatyAre ANi avajAre balutedArAnchI hatyAre ANi awajAre". www.rasik.com. 2020-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे". www.padmagandha.com. 2020-07-25 रोजी पाहिले.
  7. ^ "Shetkaryacha Asud By Pralhad Lulekar - शेतकऱ्याचा आसुड - मराठी विषय". Vidya Books (इंग्रजी भाषेत). 2020-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-25 रोजी पाहिले.
  8. ^ "डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचा गौरव समारंभ" (PDF). २६ मार्च २०१६.
  9. ^ "डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2016-01-17. 2018-06-11 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

  1. प्रल्हाद लुलेकर यांना अभिजित साहित्य पुरस्कार
  2. अनंत पैलूंंचा सामाजिक योद्धा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सह्याद्री वाहिनी मुलाखत
  3. ध्येयवादी व्यक्तिमत्त्व : प्रो डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर) Archived 2017-02-16 at the Wayback Machine.