प्रमोद कांबळे
प्रमोद कांबळे | |
---|---|
जन्म | ११ ऑगस्ट इ.स. १९६४ |
निवासस्थान | अहमदनगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | जी.डी. आर्ट (सुवर्णपदक) |
प्रशिक्षणसंस्था | प्रगत कलामहाविद्यालय, अहमदनगर |
पेशा | चित्रकार व शिल्पकार |
मूळ गाव | संवत्सर कोपरगाव तालुका जिल्हा अहमदनगर |
धर्म | हिंदू |
जोडीदार | स्वाती कांबळे |
अपत्ये | शुभंकर व कलाश्री |
वडील | दत्तात्रय |
प्रमोद कांबळे (जन्म : ११ ऑगस्ट, १९६४) हे एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार आहेत.
प्रमोद कांबळे यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासुनच मिळाले. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कलाशिक्षणास लहानपणीच सुरुवात झाली. ७वी इयत्तेत असताना त्यांना मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी अहमदनगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून फाऊंडेशन कोर्स आणि कला शिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. मूर्तिकार बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेली. तेथे त्यांनी मूर्तिकलेचा आणि मॉडेलिंगचा डिप्लोमा मिळवला.. शैक्षणिक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. याच काळात त्यांनी विविध कला दिग्दर्शकांसोबत कामही केले. नंतर त्यांनी अहमदनगरला येऊन आपला स्टुडिओ सुरू केला.
विशेष कार्य
प्रमोद कांबळे यांनी भारतातील नामवंत ५०० व्यक्तींची चित्रे अहमदनगर महानगरपालिकेच्या महावीर कलादालनातील ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या भिंतीवर काढली आहेत. काही महिन्यामध्येच केवळ पेन्सिलीच्या साहाय्याने इ.स. १९९७ साली त्यांनी हे जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी हे चित्र त्यांनी राष्ट्राला अर्पण केले
भूषवीत असलेली पदे व भूषवलेली पदे
- सदस्य, महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ अभ्यासक्रम समिती .
- सदस्य, राज्यस्तरीय कला प्रदर्शन .
- परीक्षक, कला संचालनालय
- सदस्य रोटरी क्लब, अहमदनगर
- संस्थापक, कलाजगत न्यास, अहमदनगर.
- संचालक कलाश्री क्रिएशन्स, अहमदनगर.
- सदस्य, मतिमंद शाळा समिती, अहमदनगर.
- सदस्य, रचना कला महाविद्यालय, अहमदनगर.
- सदस्य, सुनीता चित्रकला महाविद्यालय, श्रीरामपूर.
कारकीर्द
पुरस्कार (एकूण ३२)
'* विखे पाटील साहित्य जीवन गौरव' पुरस्कारामधील " कला गौरव पुरस्कार " त्यांना १३ ऑगस्ट इ.स.२०११ला देण्यात आला.
- द स्पिरिट व वॉर मेमोरिअल बद्दल भारतीय लष्कराकडून सन्मान.
- चित्रकूट, नन्ही दुनिया बद्दल राष्ट्रपतींकडून सन्मान.
- बॉम्बे आर्ट सोसायटी पुरस्कार.
- राज्य सरकारचा उत्कृष्ट चित्र-शिल्प पुरस्कार.
- सीड प्रदर्शन पुरस्कार.
- अशोक जैन पुरस्कार.
- सावेडी भूषण पुरस्कार.
प्रमोद कांबळे यांनी बनवलेल्या वन्य प्राण्यांची शिल्पे पाहण्यासाठी आणि अहमदनगर येथील यांची कार्यशाळा व स्टुडिओ पाहण्यासाठी गावोगावची माणसे येतात.