प्रमोद कमलाकर माने
प्रमोद माने | |
---|---|
जन्म नाव | प्रमोद कमलाकर माने |
जन्म | फेब्रुवारी ०५, इ.स. १९८१ जकेकुर ता. उमरगा उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | शिक्षक |
साहित्य प्रकार | कविता, कादंबरी, ललित |
विषय | सामाजिक, ग्रामीण |
प्रसिद्ध साहित्यकृती | कोरडवाहू |
पत्नी | कलावती |
अपत्ये | आत्मजा |
पुरस्कार |
|
प्रमोद माने (५ फेब्रुवारी, १९८१:जकेकूर, उमरगा तालुका - ) हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यिक आहेत. येथे झाला. हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे.
यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा तालुक्यातील जकेकूर या गावी एका अल्पभूधारक शेतकरी कुटूंबात झाला. घरी वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांच्यावर बालपणीच संत साहित्याचे संस्कार झाले. अभावग्रस्त दुष्काळी परिस्थितीतील जीवन जगताना त्यांनी कवितेतून मांडले.
शैक्षणिक माहिती
- माने हे एम.ए.(मराठी) सेट, नेट, डी.एड. आहेत. ते सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात(नांदेड) प्रा. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'एकविसाव्या शतकातील मराठी ग्रामीण कविता' या विषयावर पीएच.डी. करत आहेत.
- प्रमोद माने हे उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत शाळेत शिक्षक आहेत.
प्रकाशित साहित्य
- कोरडवाहू (कवितासंग्रह) - प्रतिभास प्रकाशन, परभणी २००५
- 'गावधूळ' आगामी कादंबरीचा अंश 'वाघूर' या दिवाळी अंकातून प्रकाशित.
- एक कवितासंग्रह आणि ललित लेखसंग्रह प्रकाशनासाठी सिद्ध.
- विविध वाड्.मयीन नियत-अनियतकालिकांमधून कविता, कथा, ललितलेखन प्रकाशित.
पुरस्कार
कोरडवाहू या कवितासंग्रहास मिळालेले पुरस्कार-
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार'.
- स्व. बापूसाहेब ढोकरे साहित्य पुरस्कार, अकोला.
इतर
- साहित्य अकादमीकडून प्रवासवृत्ती जाहीर.
- 'खेळ' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या 'गिळलो' या कवितेची 'आसक्त,पुणे' यांच्या 'रिंगण' या नाट्याविष्कारासाठी निवड व सादरीकरण.
- 'वाघूर' या दिवाळी अंकात 'गावधूळ' या आगामी कादंबरीचा अंश प्रकाशित.
- प्रतिष्ठान, कविता-रति, खेळ, मिळून साऱ्याजणी, आपले वाड्.मयवृत्त इ. विविध मराठी नियत-अनियतकालिकांमधून तसेच वाघूर, युगांतर, शब्दालय इ. दिवाळी अंकांमधून कविता कथा, ललितगद्य प्रकाशित.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन इ. संमेलनात कवितावाचन.
- 'जागतिकीकरणात मराठी कविता' या संपादित कवितासंग्रहात कवितेचा समावेश. संपादक: उत्तम कांबळे हा कवितासंग्रह संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
आगामी पुस्तके
- पेरणी नक्षत्रांची (कवितासंग्रह)
- गावधूळ (कादंबरी)
- चांदवेल (ललित लेखसंग्रह)
संदर्भ
1. https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_85.html