प्रमाण प्रतिकृती
प्रमाण प्रतिकृती हा मूलकण भौतिकशास्त्रातील एक सिद्धांत आहे जो विद्युतचुंबकीय, सौम्य नाभिकीय आणि कठोर नाभिकीय आंतरक्रियांचे वर्णन करतो व मूलकणांचे वर्गीकरण करतो. याचा विकास विसाव्या अर्धशतकात, जगभरातील वैज्ञानिकांच्या सहायक प्रयत्नांनी झाला. सद्यकालीन सिद्धांताचे निश्चितीकरण १९७० मध्ये 'क्वार्क'च्या प्रायोगिक पुष्टीकरणानंतर झाले. टॉप क्वार्क(१९९५), टाऊ न्यूट्रिनो(२०००) आणि हिग्स बोसॉन(२०१२) अशा मूलकणांच्या शोधांनी या सिद्धांतावरील विश्वास वाढवण्यासाठी मदत केली आहे. प्रमाण प्रतिकृतीच्या अनेक विस्तीर्ण प्रयोगांच्या यशस्वी स्पष्टीकरणामुळे याला "जवळपास सर्वस्वाचा सिद्धांत" असेही म्हणतात.
जरीही 'प्रमाण प्रतिकृती' हा सिद्धांत सैद्धांतिक रूपाने स्वसुसंगत समजला गेला असला व अनेक प्रयोगांचे यशस्वी भाकित करण्यात यशस्वी ठरला असला तरीही हा अनेक घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही व त्यामुळे हा 'मूलभूत अनोन्यक्रियांचा संपूर्ण सिद्धांत' असण्यापासून कमी पडतो. 'प्रमाण प्रतिकृती' हा व्यापक सापेक्षतावादानुसार स्पष्ट केलेल्या गुरुत्वाकर्षण अनोन्यक्रियेचे समावेश करत नाही, तसेच (कदाचित गडद शक्तीद्वारे वर्णन केलेल्या) विश्वाच्या प्रवेगानाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. 'प्रमाण प्रतिकृतीत' निरीक्षण खगोलशास्त्राद्वारे वर्णन केलेले सर्व गुणधर्म असणारा असा कोणताही संभाव्य 'गडद पदार्थ' कण नाही. प्रमाण प्रतिकृती 'न्यूट्रिनो हेलकावे' (आणि त्यांचे विना-शून्य वस्तुमान) यांचा समावेश करत नाही.