Jump to content

प्रभा सोनवणे

प्रभा सोनवणे ( लेखिका, कवयित्री, संपादक ‌)

प्रभा सोनवणे या लेखिका, कवयित्री, संपादक असून अनेक काव्यसंस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जन्म स्थळ- वाडा जिल्हा पालघर.

शिक्षण- एम.ए.(मराठी)- पुणे विद्यापीठ.

शालेय जीवनापासूनच कविता कथा लेखनास सुरुवात. विद्याधाम प्रशाला- शिरूर येथे इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी पहिली कथा व कविता लिहिली.

१९७५ पासून विविध साप्ताहिकातून ,मासिकातून, दिवाळी अंकांमधून सातत्याने कथा /कविता  प्रकाशित.

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्य कवयित्री सह कवितेच्या प्रचार व प्रसारासाठी स्वरचित काव्य सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम केले.

*प्रकाशित पुस्तके*

१ अनिकेत

२ जाईजुई

३ मृगचांदणी

(हे कविता संग्रह)

४ मैत्रपंचमी

(आत्मकथन)- प्रातिनिधिक

५ ती..ती...आणि ती

(पुरस्कार प्राप्त कवितेच्या कार्यक्रमाचे पुस्तक रूपांतर)-प्रातिनिधिक

६ स्नेहसावली  या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन

अभिमानश्री हा दिवाळी अंक काही वर्षे प्रकाशित केला.

*पुरस्कार*

१ कवी कालिदास

२ राष्ट्रगौरव  

३ मदर तेरेसा साहित्य पुरस्कार

४ कवी केशवकुमार

५ लळित साहित्य (मृगचांदणीला)

७ बंधुता प्रतिष्ठान साहित्य गौरव

८ साहित्य गौरव

९ गझलगौरव

१०काव्यदीप (साहित्यदीप संस्था)  

११शिवांजली साहित्य गौरव

१२प्रियदर्शनी इंदिरा (लेखिका पुरस्कार)