Jump to content

प्रभात टॉकीज

प्रभात टॉकीज हे पुण्यात अप्पा बळवंत चौकानजीक असलेले चित्रपटगृह आहे. याची स्थापना १९३४ साली किबे लक्ष्मी थियेटर नावाने झाली. येथे प्रामुख्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने आता ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. प्रभातच्या भाडेपट्टा कराराची मुदत अनेकदा वाढवण्यात आली. अलीकडचा करार २९ वर्षांपूर्वी झाला होता. तो २०१५ सालच्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात संपत आहे.. जर करार नूतनीकृत झाला नाही किंवा ही जागा प्रभात चित्रपटगृहासाठी विकत घेतली गेली नाही, तर प्रभात टॉकीज कायमचे बंद होईल.

१९३४ ते २०१४ या काळात प्रभात टॉकीजमध्ये हिंदी-मराठी-इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील एकूण १३०० चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा दीर्घ काळ चाललेला हिंदी चित्रपटच होता - जितेंद्र-जयाप्रदा यांचा 'तोहफा'. प्रभात टॉकीजमध्ये लागलेला पहिला चित्रपट म्युझिकल कॉमेडी या प्रकारातील इंग्रजी चित्रपट - 'लव्ह मी टू नाइट.' हा होता. त्यानंतर लगेच ’अमृतमंथन’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला-

गेल्या ३८ वर्षांत मात्र नाममात्र अपवाद वगळता सर्व मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट आहे- माहेरची साडी. तो सलग तब्बल १२८ आठवडे चालला. याशिवाय अनेक चित्रपट २५ ते ५० आठवडे चालले.

प्रभात हे चित्रपटगृह आणि नाट्यगृह म्हणूनही वापरले जायचे. तेथे बालगंधर्व यांचेही प्रयोग झाले आहेत.

भागीदार: मूळचे व आताचे

प्रभात फिल्म कंपनीचे मूळचे चार भागीदार होते- व्ही. शांताराम, फत्तेलाल, व्ही.जी. दामले आणि बाबुराव पै. पुढे व्ही.शांताराम आणि फत्तेलाल कंपनीतून बाहेर पडल्याने दामले, पै हे भागीदार उरले आहेत.