Jump to content

प्रभाकर मांडे

डाॅ. प्रभाकर मांडे (इ.स. १९३३:सावखेड, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र) हे विद्यापिठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद झाले.

डाॅ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणते. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या. या परिषदांमधून अभ्यासकांना डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे, इ. विद्वानांचे मार्गदर्शन लाभले.[]

मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १२हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. व सुमारे तेवढेच एम.फिल झाले.

पुस्तके

  • आदिवासी मूलत: हिंदूच
  • आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या
  • उपेक्षित पर्व
  • कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप)
  • गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत
  • गावगाड्याबाहेर
  • चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी, संपादित)
  • दलित साहित्याचे निराळेपण
  • पंडित दामोदर रचित महानुभावीय पद्मपुराण (संपादित)
  • बिल्वदल
  • बुडालेला गाव
  • भारतीय आदिवासींचे स्थान
  • भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या
  • मांग आणि त्यांचे मागते
  • मायबोलीचे व्याकरण व लेखन (सहसंपादित)
  • मौखिक वाङ्मयाची परंपरा
  • रामकथेची मौखिक परंपरा
  • लोकगायकांची परंपरा
  • लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन
  • लोकपरंपरेतील शहाणपण
  • लोकपरंपरेतील स्त्रीप्रतिमा
  • लोकमानस आणि लोकाचार
  • लोकमानस रंग आणि ढंग
  • लोकरंग आणि अभिजात रंगभूमी
  • लोकरंगकला आणि नागर रंगभूमी (संपादित)
  • लोकरंगधारा
  • लोकरंगभूमी
  • लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी
  • लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व
  • लोकसाहित्याचे अंतःप्रवाह
  • लोकसाहित्याचे स्वरूप
  • शिक्षणनीतीचे राजकारण
  • श्रीसमर्थांचा लक्षणविचार
  • सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्बरूप

पुरस्कार आणि सन्मान

  • सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे अध्यक्षपद.
  • धोंडीराम सभाजी वाडकर यांनी 'डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने' नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्र टाइम्स". 2018-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१८-०५-१२ रोजी पाहिले.