प्रभाकर भालेकर
यशवंत भालेकर किंवा सुहास भालेकर याच्याशी गल्लत करू नका.
प्रभाकर भालेकर हे मराठी संगीत दिग्दर्शक आहेत.
विद्याधर गोखले लिखित मदनाची मंजिरी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन राम मराठे आणि प्रभाकर भालेकर या जोडीने केले होते.
भालेकरांचे संगीत असलेली गीते
- अंग अंग तव अनंग (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायिका - सुमन माटे, नाटक - मदनाची मंजिरी)
- आली प्रणय-चंद्रिका करी (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायक - रामदास कामत, नाटक - मदनाची मंजिरी)
- ऋतुराज आज वनि आला (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायिका - मधुवंती दांडेकर, नाटक - मदनाची मंजिरी)
- तारिल तुज अंबिका (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायक - शरद जांभेकर, नाटक - मदनाची मंजिरी)
- पहा रे परमेशाची लीला (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायक - पं. राम देशपांडे, नाटक - मदनाची मंजिरी)
- मजला कुठे न थारा (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायक - रामदास कामत, नाटक - मदनाची मंजिरी)
- मानिनी सोड तुझा अभिमान (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - मदनाची मंजिरी)
- ये मौसम है रंगीन (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायिका - मधुवंती दांडेकर, नाटक - मदनाची मंजिरी)
- रविकिरणांची झारी घेउनी (भावगीत, कवी - रमेश अणावकर, गायिका - आशालता वाबगावकर)
- राधे तव रुसवा का (नाट्यगीत, कवी - विद्याधर गोखले, गायिका - कान्होपात्रा किणीकर, नाटक - मदनाची मंजिरी)