Jump to content

प्रभाकर ऊर्ध्वरेषे

प्रभाकर ऊर्ध्वरेषे
जन्म ९ जानेवारी १८१९

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: - ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते.

नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४० च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.[]

प्रकाशित साहित्य

  • आई (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - मॅक्झिम गाॅर्की)
  • बियॉन्ड द लास्ट ब्लू माऊंटन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रूसी लाला)
  • शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस (ग्रीक नाट्यकृतीचे भाषांतर)
  • सफलतेमधील आनंद - जे.आर.डी. टाटा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रूसी लाला)
  • हरवलेले दिवस (आत्मचरित्र)

इतर

सहा ग्रीक नाट्यकृतीचे अनुवाद : लेखक आणि (नाट्यकृती)

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस), माधुरी भिडे (ॲगमेमनॉन, कोईफोरी, युमेनिडीज्‌) व आ.ना. पेडणेकर (थीब्सवर सातांची चढाई, शरणार्थी) यांनी केले असून, त्यांचा संच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ D., G. P. (1990). "Oh, These Communists!". Economic and Political Weekly. 25 (15): 757–758.