Jump to content

प्रफुल्ल शिलेदार

प्रफुल्ल शिलेदार

प्रफुल्ल शिलेदार (जन्म : नागपूर, इ.स. १९६२) हे मराठीतले एक लेखक आणि कवी आहेत. मूळचे विज्ञानातले पदवीधर असले तरी त्यांनी नंतर मराठी आणि इंग्रजी साहित्यातल्या पदव्या घेतल्या आहेत. नागपूरमध्ये ते एका बँकेत मॅनेजर आहेत. इ.स. १९८०पासून ते करीत असलेल्या कविता मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत आल्या आहेत.

प्रफुल्ल शिलेदारांची साहित्यिक कारकीर्द

  • पहिले पुस्तक ’स्वगत’ : १९८१पासून १९९०पर्यंत लिहिलेल्या कविता. हा संग्रह १९९३मध्ये प्रकाशित झाला. या पुस्तकाला नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा ’विशाखा’ पुरस्कार मिळाला.
  • २रे पुस्तक ’जगण्याच्या पसाऱ्यात’ पॉप्युलर प्रकाशनने २००६मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कवितांसाठीचा ’केशवसुत पुरस्कार’, आणि त्याच बरोबर विदर्भ साहित्य संघाचाशरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार’सुद्धा मिळाला.
  • यांशिवाय कथालेखन, थोरामोठ्यांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणे, वार्तांकने, वर्तमानपत्रांत स्तंभलेखन, चित्रपट परीक्षणे, प्रवासवर्णने आदींचे लेखन प्रफुल्ल शिलेदारांनी केले आहे.
  • नव्याने प्रसिद्ध झालेल्या मराठी काव्यांची समीक्षा करणारे लेखनही ते करतात.
  • प्रफुल्ल शिलेदार यांनी चर्चासत्रांमध्ये ’विंदा करंदीकर’ आणि ’शरच्चंद्र मुक्तिबोध’ यांच्यावर लिहिलेले स्वतःचे निबंध वाचले आहेत.
  • विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या मुखपत्राच्या संपादक मंडळातही ते काही काळ होते.
  • संशयात्मा (अनुवादित कवितासंग्रह)

पुरस्कार

  • केशवसुत पुरस्कार
  • विशाखा पुरस्कार
  • शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार
  • साहित्य अकादमी (अनुवाद) पुरस्कार - संशयात्मा या काव्यसंग्रहासाठी