Jump to content

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही भारतातील भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. याचा उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता. याचे विमोचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेद्वारे दि. ९ मेला कोलकाता येथे झाले. मे २०१५ च्या आकडेवारीनुसार भारतात फक्त २०% लोकांचा कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. या योजनेचा उद्देश हा आकडा वाढविणे असा आहे.[ संदर्भ हवा ]

वैशिष्ट्ये

१) लक्ष्यगट - जीवन विमा न नोंदवलेले सर्व नागरिक

२) वय व पात्रता - लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्षे असले पाहिजे योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास बँक खाते आवश्यक आहे , जे ५० वर्षे वयाच्या    आधीपासून योजनेत सामील आहेत त्यांना वयाच्या ५५ वर्षापर्यॅंत जोखीम संरक्षण मिळते .

३) हप्ता-  योजनेसाठी वार्षिक ३३० रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  १ जून ते ३ मे असेल .

४) विमा लाभ - लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती ) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु. अर्थसाहाय्य मिळेल

५) व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो

संदर्भ