प्रदीप मुळ्ये
प्रदीप मुळ्ये हे मराठी नाट्यसृष्टीतले एक नेपथ्यकार आहेत. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांचे नेपथ्य केले आहे.
मुळ्ये यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी घेतली आणि द.ग. गोडसे, दामू केंकरे यांबरोबर कलेच्या मूलतत्त्वांचा अभ्यास केला. प्रारंभीच्या काळातच त्यांनी पं. सत्यदेव दुबें यांच्याबरोबर काम केले. दुबेंनी दिग्दर्शित केलेल्या सावल्या, इसापचा गॉगल या नाटकांचे अत्यंत वेगळे, नाविन्यपूर्ण नेपथ्य मुळ्येंनी केले. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील नेपथ्यासाठीचे एका वर्षातील पहिले, दुसरे व तिसरे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. राजा सिंह, इंदू काळे व सरला भोळे, सारे प्रवासी घडीचे, चार मोजायचा नाही, ड्राय डे या नाटकांचे दिग्दर्शनदेखील त्यांनी केले आहे. आविष्कार या प्रायोगिक नाट्यसंस्थेने प्रकाशित केलेल्या 'रंगनायक' या अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथाचे ते एक संपादक आहेत.
प्रकाशयोजना असलेली नाटके
- इंदू काळे व सरला भोळे
- इसापचा गॉगल
- दोन स्पेशल
- प्रपोजल
- राजा सिंह
- वाडा चिरेबंदी
- सारे प्रवासी घडीचे
- सावल्या
पुरस्कार
- कलागौरव पुरस्कार
- कलादर्पण पुरस्कार
- डॉ. श्रीराम लागू यांच्या रूपवेध संस्थेचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
- भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार
- मराठी ॲचीव्हमेन्ट ॲन्ड इनोव्हेशन अवॉर्ड (MAAI)
- मराठी इंटरनॅशनल फ़िल्म ॲन्ड थिएटर ॲवॉर्ड (MIFTA)
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (SNA Award)