प्रतिमा भौमिक
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९८० | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
प्रतिमा भौमिक (२८ मे, १९६९ - ) या एक भारतीय राजकारणी आहेत. या दुसऱ्या मोदी मंत्रालयात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. [१] केंद्रीय मंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या त्रिपुराच्या रहिवासी आणि ईशान्य भारतातील दुसऱ्या महिला ठरल्या आहे. [२] भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून त्या त्रिपुरा पश्चिम येथून लोकसभेवर निवडून आल्या. [३] त्यांना जानेवारी २०१६ मध्ये त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांच्या संघात राज्य सरचिटणीस म्हणून सामील करण्यात आले. सन् १९९१ पासून त्या भाजपच्या सदस्या आहेत. त्या "दीदी" या नावाने प्रसिद्ध आहे.
सुरुवातीचे जीवन
प्रतिमा भौमिकचा जन्म २८ मे १९६९ रोजी देबेंद्र कुमार भौमिक आणि कानन भौमिक यांच्या पोटी त्रिपुरा राज्यातील सेपाहिजाला येथील बारनारायण गावात झाला. १९९१ मध्ये त्रिपुरा विद्यापीठाच्या अंतर्गत महिला महाविद्यालय, आगरतळा येथून बायो-सायन्समध्ये त्या पदवीधर आहेत.
राजकीय कारकीर्द
प्रतिमा भौमिक १७व्या लोकसभेवर त्रिपुरा पश्चिममधून निवडून आल्या. [४] निकाल औपचारिकपणे घोषित झाल्यानंतर, IANS ला दिलेल्या मुलाखतीत, ५० वर्षीय विज्ञान पदवीधर प्रतिमा भौमिक म्हणाल्या: "मी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा विकास मंत्र आणि दूरदृष्टी हीच लोकांच्या कल्याणासाठी आमची भावी वाटचाल आहे.” "मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांचे त्रिपुराला आदर्श राज्य बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आम्ही सर्व काम करू," असे भाजपच्या राज्य युनिटचे सरचिटणीस भौमिक यांनी सांगितले.
भौमिक यांनी ५,७३,५३२ मते मिळवून (मतदान केलेल्या वैध मतांपैकी ५१.७७%) त्रिपुरा पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिस्पर्धी सुबल भौमिक यांचा ३,०५,६८९ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांनी काँग्रेसच्या महाराणी बिभू कुमारी देवींना पण पराभूत केले.
कॅबिनेट फेरबदल झाल्यावर त्या दुसऱ्या मोदी मंत्रालयात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री झाल्या. [५] त्रिपुरातील त्या पहिल्या केंद्रीय मंत्री झाल्या. [६]
संदर्भ
- ^ "Cabinet Reshuffle: The full list of Modi's new ministers and what they got". The Economic Times. 8 July 2021. 8 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Pratima Bhowmik: First Tripura resident to make it to Union cabinet". 8 July 2021.
- ^ "Pratima Bhoumik(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- TRIPURA WEST(TRIPURA) - Affidavit Information of Candidate".
- ^ "Members : Lok Sabha".
- ^ "Modi cabinet rejig: Full list of new ministers". India Today. 2021-07-08 रोजी पाहिले.
- ^ "Pratima Bhoumik becomes first politician from Tripura to join Union Cabinet". India Today. 2021-07-08 रोजी पाहिले.