Jump to content

प्रतिमा जोशी

प्रतिमा जोशी (२३ डिसेंबर, १९५९ ) या महाराष्ट्र टाइम्सच्या माजीपत्रकार असून, सामा​जिक प्रश्नांवर सक्रिय असलेल्या मराठी कथाकार आहेत. या मुंबईत राहतात.

पुस्तके

  • अज्ञाताचा प्रवासी (अनुवादित)
  • इराण जागा होतोय (अनुवादित) नोबेलविजेत्या मानव अधिकार कार्यकर्त्या शिरीन इबादी यांच्या Iran Awakening या पुस्तकाचा अनुवाद
  • जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी (कथासंग्रह, संपादक प्रा.पुष्पा भावे)
  • जीएल आणि तारा : धगधगता अंगार आणि रसरसता निखारा
  • दण्डकारण्य (कथासंग्रह)
  • शोध बाईमाणसाचा (वैचारिक)

सन्मान

  • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
  • ’जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी’ या पुस्तकाला २०१० सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार
  • वरुणराज भिडे मित्रमंडळाचा ’वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार’ (२०१०)
  • एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार (१७ जानेवारी २०१५)
  • २९ सप्टेंबर २०१३ रोजी चंदगड, जि. कोल्हापूर येथे झालेल्या कष्टकरी स्त्रियांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • २२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या घाटकोपर (मुंबई) येथल्या मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • लेखन व समाजकार्य यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे राम आपटे पुरस्कार
  • दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे ‘हिरकणी’ पुरस्कार
  • सातारा येथून मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
  • पत्रकारितेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह अन्य राज्यस्तरीय मान्यवर संस्थांचे राज्यपातळीवरील एकंदर नऊ पुरस्कार.
  • शरीरविक्रय करणाऱ्या व्यक्ती आणि मानवी तस्करीसंबंधात अभ्यास करण्यासाठी इ. स. २०००मध्ये अमेरिकन सरकारच्या कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत तीन आठवड्यांचा अभ्यासदौरा.

सामाजिक सक्रियता

० विद्यार्थीदशेपासून म्हणजे १९७८पासून लोकशाही समाजवादी विचारांवर आधारित सामाजिक चळवळींत सक्रिय. (१९७९ ते १९८२ पूर्णवेळ कार्यकर्ता.) अनेक आंदोलनांत सक्रिय.

० देवदासी-शरीरविक्रय करणाऱ्या महिला, मुले व व्यक्तींच्यात दोन दशकांहून अधिक काळ (१९७९ ते २००३) कार्यरत. या संदर्भात मुंबईतील कामाठीपुरा विभागात शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेशीर मदत व प्रतिबंधात्मक काम. हे काम पूर्णतया विनावेतन तसेच कोणत्याही फंडिंगशिवाय सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून चालवले. या प्रयत्नांत ९० च्या वर मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. या प्रश्नावर काम करताना आनंदवन-वरोरा, सावली-निपाणी, देवदासी निर्मूलन परिषद-गडहिंग्लज, साने गुरुजी छात्रालय-नाशिक अशा राज्य स्तरावरील अन्य संस्था/संघटनांशी जोडून घेण्याचा प्रयत्न.

० मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून पेटलेल्या संघर्षात सवर्ण व दलित समाजात संवाद निर्माण व्हावा, कटुता राहू नये यासाठी विशेष अभियानात सहभागी. नामांतर व्हावे यासाठी ६ डिसेंबर १९७९ रोजी झालेल्या सत्याग्रहात अटक. १५ दिवसांचा पुण्यातील येरवडा तुरुंगात कारावास. 

० महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान या डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेशी संबंध. 'पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक.

० अंधश्रद्धा निर्मूलन/दलित अत्याचार/ असंघटित कामगार/सफाई कामगार/एकल महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी संबंध.

० सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्र या संस्थेच्या अध्यक्ष. ‘सहयात्री’ या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्या निमंत्रक.

० डॉ. य. दि. फडके प्रगत संशोधन केंद्राच्या सल्लागार

० मुंबईच्या गिरणगाव विभागातील आर. एम. भट हायस्कूल या राष्ट्रीय विचारांच्या प्रगतिशील मान्यवरांनी सुरू केलेल्या शाळेच्या गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघच अध्यक्ष