प्रतापगड (गोंदिया)
Arjuni Pratapgarh Fort अर्जुनी प्रतापगड किल्ला | |
नाव | Arjuni Pratapgarh Fort अर्जुनी प्रतापगड किल्ला |
उंची | २१० मीटर |
प्रकार | वनदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | गोंदिया, महाराष्ट्र |
जवळचे गाव | अर्जुनी मोरगाव. |
डोंगररांग | भुलेश्वर रांग,सह्याद्रीची उपरांग |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
प्रतापगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन आणि पुरातन काळातील एक किल्ला आहे. विदर्भामध्ये वैशिष्ट्ये असे की इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे किल्ले म्हणून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा अर्जुनी/मोरगाव उपविभागात गोंदिया जिल्हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक वनदुर्ग आहे.
भौगोलिक स्थान
विदर्भामध्ये गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका व तसेच उपविभाग आहे. अर्जुनी मोरगाव गोंदिया-चंद्रपूर-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गाशी जोडलेले आहे. गोंदिया-कोहमारा-अर्जुनी मोरगाव प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आहे. हा महामार्ग नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव-नागझिरा अभयारण्य प्रसिद्ध आहे. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी राज्य महामार्ग क्रमांक-२७७ आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकाच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिद्ध आहे.
जाण्यासाठी मार्ग
राज्य महामार्ग क्र.-२७५ अर्जुनी मोरगाव
गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर प्रमुख राज्य महामार्ग (प्र.रा.मा.क्र-११) तथा राज्य महामार्ग क्र.-२७५ अर्जुनी मोरगाव उपविभागात नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. ही रांग प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग हा पूर्वेकडून आहे. पूर्व पायथ्यापर्यंत गाडीमार्गाने पोहोचता येते. प्रतापगडाच्या पूर्व पायथ्याच्या पठारावर दर्गा आहे. दर्ग्याजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. दर्ग्याजवळच किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात. येथील मार्ग हा दोन्हीकडून तटबंदीने बंदिस्त केलेला दिसतो. ही तटबंदी रचीव दगडांची आहे. या मार्गावर सर्वत्र पडापड झालेली आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी या मार्गाच्या उजवीकडून दगडधोंड्यामधून एक नवी वाट तयार झाली आहे.
घडण व पहाण्यासारखी ठिकाणे
किल्याची चढाई पायथ्यापासून २०० मीटर आहे. या जंगलात साधारणतः एक किलोमीटर चालत कड्याच्या पायथ्याला पोहोचता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात.
या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरू करावी. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे कडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा एका माचीचाच भाग असून तो रचिव तटबंदीने सरंक्षीत केलेलो आहे. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अस्वले खूप आहेत. अस्वल हा जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णतः वेढलेली आहे. या जंगलात पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात.
या कबरीपासून डावीकडील तटबंदीकडे पायऱ्या गेलेल्या आहेत. बुरुजाच्या बाजूने पडक्या तटबंदीमधून गडप्रवेश करावा लागतो. डावीकडील वाटेने मोठ्या तलावाजवळून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाता येते. माथ्यावर काही चौथरे पडलेले असून ते एका तटबंदीने वेढलेले आहेत. पश्चिम कड्यावरून दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. पश्चिमेकडील माचीचे उत्तम दर्शन येथून होते. कड्याच्या कडेकडेने उत्तर बाजूच्या कड्यावर येता येते.
येथे अनेक नैसर्गिक गुहा असून वन्य श्वापदांचा वावरही आढळतो. येथे खाली तळघर आहे. येथून एक वाट खालच्या पश्चिम माचीवर जाते. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी बेसाऊ झालेला आहे.