Jump to content

प्रकाश विठ्ठल इनामदार

प्रकाश इनामदार
प्रकाश इनामदार
जन्मप्रकाश विठ्ठल इनामदार
ऑक्टोबर २८, इ.स. १९५०
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यूडिसेंबर २३, इ.स. २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९७४-२००७
भाषामराठी
प्रमुख नाटके गाढवाचं लग्न
प्रमुख चित्रपट देवता
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
वडील अप्पासाहेब इनामदार
पत्नी जयमाला इनामदार
अपत्ये धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार
अधिकृत संकेतस्थळhttp://www.prakashinamdar.in

प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.

कारकीर्द

त्यांनी कलासंगम या संस्थेची स्थापना केली.

प्रमुख नाटके

वगनाट्ये

  • थांबा थोडं दामटा घोडं
  • विच्छा माझी पुरी करा
  • आतून कीर्तन वरून तमाशा
  • सखाराम हवालदार
  • कथा अकलेच्या कांद्याची
  • बाईचा लळा दौलती खुळा
  • गाढवाचं लग्नं
  • उल्लू दरबार

संगीत नाटके

सामाजिक नाटके

  • डार्लिंग डार्लिंग
  • सौजन्याची ऐशी तैशी
  • लेकुरे उदंड झाली
  • बिऱ्हाड वाजलं
  • लफडा सदन
  • करायला गेलो एक
  • सारंगा
  • आमचं जमलं बर का
  • स्वयंसिद्धा
  • वऱ्हाडी माणसं
  • दिवा जाळू दे सारी रात
  • बेडरूम बेडरूम
  • सासरचं दुखणं
  • संभुसांच्या चाळीत
  • जरा वजन ठेवा
  • धरपकड
  • सूनबाई घर तुझंच आहे
  • जोडी तुझी माझी
  • महायोग

ऐतिहासिक नाटके

  • बेबंदशाही
  • आग्र्याहून सुटका
  • रायगडला जेव्हा जाग येते

द्विपात्री नाटके

  • गुदगुल्या
  • टेस्टी मिसळ

प्रमुख चित्रपट

  • मुद्रांक (इ.स. २००८)
  • अदला बदली (इ.स. २००८)
  • हि पोरगी कोणाची (इ.स. २००४)
  • वाजवा रे वाजवा
  • गोष्ट धमाल नाम्याची (इ.स. १९८४)
  • नसती उठाठेव
  • लेक चालली सासरला
  • जावयाची जात
  • आपली माणसं
  • सतीची पुण्याई
  • स्त्रीधन
  • बिन कामाचा नवरा
  • थोरली जाऊ
  • जगा वेगळी प्रेम कहाणी (इ.स. १९८४)
  • देवता (इ.स. १९८३)
  • आयत्या बिळावर नागोबा (इ.स. १९७९)
  • दुनिया करी सलाम (इ.स. १९७५)
  • नवरा माझा ब्रम्हचारी (इ.स. १९७४)
  • माहेरची माणसं
  • चोराच्या मनात चांदणं
  • श्री सिद्धेश्वर माझा पाठीराखा
  • पैजेचा विडा
  • कडकलक्ष्मी (इ.स. १९८०)
  • दे धडक बेधडक

दूरचित्रवाणी कार्यक्रम

संदर्भ

बाह्य दुवे