Jump to content

प्रकाश झा

प्रकाश झा

प्रकाश झा (२७ फेब्रुवारी, १९५२ - ) हे भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे बहुतेक त्यांच्या राजकीय आणि सामाजिक-राजकीय चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचे काही गाजलेले चित्रपट पुढील प्रमाणे आहेत - दामुल (१९८४), मृत्युदंड (१९९७), गंगाजल (२००३), अपहरण (२००५), राजनीती (२०१०), आरक्षण (२०११) चक्रव्यूह (२०१२), आणि सत्याग्रह (२०१३), डर्टी पॉलिटिक्स (२०१५) इत्यादी. याशिवाय फेसेस आफ्टर द स्टॉर्म (१९८४) आणि सोनल (२००२) यांसारख्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या माहितीपटाचे ते निर्माता आहेत.

त्यांची 'प्रकाश झा प्रॉडक्शन' ही स्वतःच्या नावाची चित्रपट निर्मितीची कंपनी देखील आहे. त्याच्याकडे पाटण्यातील P&M मॉल आणि जमशेदपूरमधील P&M हाय-टेक मॉलची मालकी आहे.