Jump to content

प्रकाश आमटे


प्रकाश आमटे
जन्म प्रकाश आमटे
26 december 1948
निवासस्थानहेमलकसा, गडचिरोली जिल्हा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एमबीबीएस, एमएस
प्रशिक्षणसंस्था महात्मा गांधी मेडिकल कॉलेज
पेशा समाजसेवा
कार्यकाळ १९७३ पासून
धर्महिंदू
जोडीदारमंदाकिनी आमटे
अपत्ये दिगंत,अनिकेत,आरती
वडील मुरलीधर देवीदास आमटे
आईसाधना आमटे
पुरस्कारमॅगसेसे पुरस्कार; श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सपत्‍नीक सन्मानित
संकेतस्थळ
http://www.lokbiradariprakalp.org/


प्रकाश आमटे बिबट्यासह

परिचय

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

डॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तके

  • प्रकाशवाटा (२०१३ सालापर्यंत २५ आवृत्त्या)
  • रानमित्र (२०१३)

चित्रपट

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.

याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल

पुरस्कार आणि सन्मान

  • १९८४ - आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार
  • इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
  • २००९ - गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
  • २००२ - पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार
  • २००८ - मॅगसेसे पुरस्कार
  • २०१४ - मदर तेरेसा पुरस्कार
  • श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
  • २०१२ - लोकमान्य टिळक पुरस्कार
  • पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
  • आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ (१२ डिसेंबर २०१८)

संदर्भ

बाह्य दुवे