प्रकाशबापू वसंतराव पाटील
प्रकाशबापू वसंतदादा पाटील (जून २१,१९४७-ऑक्टोबर २१,२००५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९८४, १९८९, १९९१, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून राजकारणात सक्रिय आहेत.