Jump to content

पोहरादेवी

  ?पोहरादेवी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमानोरा
जिल्हावाशिम जिल्हा
सरपंच
बोलीभाषाबंजारा भाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

पोहरादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या वाशीम जिल्ह्यातील एक गाव आहे. पोहरादेवी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या ठिकाणी जगद्गुरू संत सेवालाल महाराज तसेच माता जगदंबा देवीचे भव्य मंदिर आहे . श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा भारतीय कृषीक्रांतीचे प्रवर्तक वसंंतराव नाईक, जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनीही भेटी दिलेली असून त्यांची समाधी पोहरादेवी पासून काही अंतरावर गहुली गड येथे आहे. तसेच पोहरादेवी येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची देखील समाधी आहे. पोहरादेवी पासून पश्चिमेकडे उमरीगड हे संत सामकी मातेचे जागृत मंदिर असून बहुजनाचे मातृतिर्थ मानले जाते.

जवळचे रेल्वे स्थानक मूर्तीजापूर ,अकोला व वाशिम आहे. अमरावती ८७ किमी आहे. अकोला, मंगरूळपीर शहरांमधून (दिग्रस व मनोरा) पोहरादेवी यथे जाण्यासाठी एस टी बसेस आणि खाजगी वाहने मिळतात. पोहरादेवीपासूनून वाशीम ५१ किलोमीटरवर, यवतमाळ ७१ कि.मी.वर आणि हिंगोली ७७ कि.मी.वर आहे. रामनवमीला दरवर्षी येथे भव्य यात्रा भरते.

भौगोलिक स्थान

हवामान

पोहरादेवी येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे तापमान वर्षभर असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

पोहरादेवी ची बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख आहे. येथे भक्तिधाम व नगारा भवन अशी दोन महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच काही अंतरावर श्रीक्षेत्र मातृतीर्थ उमरीगड व प्रेरणाभूमी गहुलीगड ही श्रद्धा स्थळ आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नांनी पोहरादेवी येथे नगारा वास्तू संग्रहलयाचे भूमिपूजन पार पडले. संत सेवालाल महाराज यांचा भव्य पुतळा व सेवा ध्वज देखील आहे. तसेच वन विभागाद्वारा येथे वन पर्यटन देखील साकारले आहे. रामनवमी च्या यात्रेसाठी पोहरादेवी देशभरात प्रसिद्ध आहे. तसेच येथून जवळच समस्त शेतकरी व बहुजन समाजाचे प्रेरणास्थळ गहुलीगड (गहुली) असून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक वसंतराव नाईक व जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांची समाधी आहे.

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== ऊमरीगड

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/