Jump to content

पोलोनेझ

पोलोनेझ (1888)

पोलोनेझ हे एक पोलिश राष्ट्रीय नृत्य. योद्ध्यांचे विजयनृत्य वा लोकनृत्य, असे त्याचे स्वरूप असावे. १५७३ च्या सुमारास पोलिश सरदारांनी हेन्‍री ऑफ आंझू याच्या राज्यारोहणप्रसंगी हे नृत्य संचलनाच्या स्वरूपात सादर केले व त्यास प्रतिष्ठा मिळवून दिली. कालांतराने पुरुषांच्या जोडीने स्त्रियाही त्यात भाग घेऊ लागल्या. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकांत ह्या नृत्याने दरबारी युग्मनृत्याची (बॉल) व इतर शाही समारंभांची सुरुवात होत असे.


या नृत्याच्या उमरावी स्वरूपामध्ये नर्तक-नर्तकी त्यांच्या सामाजिक स्थानानुसार उभे रहात व दालनाच्या सभोवती दरबारी मिरवणुकीप्रमाणे संथ पण डौलदार गतीने, आघातपूर्ण व आकर्षक पदन्यास करीत फेर घरून नाचत. पुढे अभिजात तसेच आधुनिक बॅर्लेमध्येही ह्या नृत्याचा अंतर्भाव होऊ लागला. उदा., स्वॉन लेक, द स्लीपिंग ब्यूटी, द फाउंटन ऑफ बख्चीसराई जार्ज बालंचीनची नाइट शॅडो आणि थीम अँड व्हेरिएशन्स ही बॅले नृत्ये.


पुढे ह्याच ढंगाच्या संगीतालासुद्धा हे नामाभिधान प्राप्त झाले. पोलोनेझ संगीताचा उपयोग बेथोव्हन, मोट्सार्ट, हॅंडल इ. जर्मन संगीतकारांनी उत्कृष्ट प्रकारे केला. शॉपॅंने हा संगीतप्रकार खूपच समृद्ध केला. संगीतिकेमध्येही पोलोनेझचा उपयोग मुसॉर्गस्कईने आपल्या बरीस गदुनोव ह्या ऑपेरामध्ये खुबीने करून घेऊन लोकप्रियता मिळविली.

संदर्भ

[]

  1. ^ "https://vishwakosh.marathi.gov.in/27201/". External link in |title= (सहाय्य)