होआव दुसरा (पोर्तुगीज: João II) (मार्च ३, १४५५ - ऑक्टोबर २५, १४९५) हा पोर्तुगालाचा तेरावा राजा होता. त्याने पोर्तुगीज राजतंत्राची ताकद पुनर्प्रस्थापित केली, पोर्तुगालाची अर्थव्यवस्था बळावण्यासाठी प्रयत्न केले, तसेच आफ्रिका व पौर्वात्य देशांकडील साहसी सागरी मोहिमांना पुन्हा राजाश्रय दिला.