Jump to content

पॉल न्यूमन

पॉल लेनर्ड न्यूमन (२६ जानेवारी, १९२५:शेकर हाइट्स, ओहायो, अमेरिका - २६ सप्टेंबर, २००८:वेस्टपोर्ट, कनेटिकट, अमेरिका) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, शर्यतीतील कारचालक आणि दानशूर होता.

याला कलर ऑफ मनी या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय एमी पुरस्कार, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार याला मिळाले.

अभिनयातून निवृत्त झाल्यावर न्यूमनने न्यूमन्स ओन ही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी सुरू केली व त्यात होणारा सगळा फायदा दरवर्षी दान केला. त्याचा मृत्यूनंतरही ही प्रथा कायम आहे. २०१७पर्यंत न्यूमन्स ओन कंपनी ने अंदाजे ४८ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर दान केले आहेत.