Jump to content

पॉइंट प्लेझंट (न्यू जर्सी)

पॉइंट प्लेझंट अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,३९२ होती. ओशन काउंटीतील हे शहर ओशन सिटीचे उपनगर आहे. या शहराच्या पुळणीवर न्यू जर्सी आणि न्यू यॉर्क शहरातून पर्यटक येतात.

इ.स. १५००च्या सुमारास लेनापे जमातीतील लोक या ठिकाणास उंच लाकडांचा प्रदेश म्हणत असल्याचा उल्लेख आहे. १६६५ च्या सुमारास येथे युरोपीय लोकांनी पहिल्यांदा वस्ती केली.