Jump to content

पेशावर


पेशावर
پشاور‎
पाकिस्तानमधील शहर
पेशावर is located in पाकिस्तान
पेशावर
पेशावर
पेशावरचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 34°1′N 71°35′E / 34.017°N 71.583°E / 34.017; 71.583

देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत खैबर पख्तूनख्वा
क्षेत्रफळ १,२५७ चौ. किमी (४८५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१७८ फूट (३५९ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ३३,०७,७९८
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


पेशावर (पश्तो: پېښور‎; उर्दू: پشاور‎) ही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. पेशावर पाकिस्तानच्या उत्तर भागात काबुल नदीच्या खोऱ्यामध्ये खैबर खिंडीच्या जवळ वसले असून ते अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. मध्य आशियादक्षिण आशिया मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले पेशावर सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या खैबर पख्तूनख्वामधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.

सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनतर अमेरिकेने तालिबानविरुद्ध चालू केलेल्या युद्धामुळे पेशावरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक अतिरेकी गट येथे कार्यरत असून अफगाणिस्तानमधील अनेक निर्वासित लोकदेखील येथे स्थानांतरित झाले. येथे सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे पेशावरात असुक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. १६ डिसेंबर २०१४ रोजी पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.

खेळ

क्रिकेट हा पेशावरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून पेशावर पॅंथर्स हा क्रिकेट क्लब येथे आहे.

पेशावरचा इतिहास

पुरातत्त्वशास्त्री फिदाउल्ला सेहराई यांनी पेशावर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत