पेरी मेसन
पेरी मेसन हा आधी अमेरिकेच्या डेन्व्हर (कॉलोराडो) येथील आणि नंतर लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) येथील काल्पनिक वकील आहे.
आपल्या वकिली कौशल्याने गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पेरी मेसन या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून अर्ल स्टॅनले गार्डनर यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या बहुसंख्य कादंबऱ्यांची मराठी रूपांतरे झाली आहेत. अश्या कादंबऱ्यांची आणि त्यांच्या अनुवादकांची यादी :
पेरी मेसन मालिकेतील मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या आणि त्यांचे अनुवादक
- द केस ऑफ द आईस-कोल्ड हॅंन्ड्स (बाळ भागवत)
- द केस ऑफ द काऊंटरफीट आय (आनंद केतकर)
- द केस ऑफ द केअरलेस क्युपिड (बाळ भागवत)
- द केस ऑफ द क्रिमसन कीस (ज्योती आफळे)
- द केस ऑफ द क्रुकेड कॅंडल (बाळ भागवत)
- द केस ऑफ द डेडली टाॅय (ज्योती आफळे)
- द केस ऑफ द डेम्यूर डिफेन्डन्ट (बाळ भागवत)
- द केस ऑफ द लकी लूझर (बाळ भागवत)
- द केस ऑफ द हाऊलिंग डाॅग (बाळ भागवत)
- द केस ऑफ द हॉंटेड हसबन्ड (ज्योती आफळे)
- खतरनाक खेळणं (अपर्णा भावे)
- पछाडलेला नवरा (अपर्णा भावे)
- बदनाम नववधू (अपर्णा भावे)
- ब्लॅकमेल (अपर्णा भावे)
- ब्लॅक मेलरचा डाव (अपर्णा भावे)
दूरचित्रवाणी मालिका
पेरी मेसन कथांवर इंग्रजी चित्रवाणी मालिका होती. तिच्यात पेरी मेसनची भूमिका रेमंड विल्यम स्टेसी बर याने केली होती.