Jump to content

पेमा खांडू

पेमा खांडू

विद्यमान
पदग्रहण
१७ जुलै २०१६
मागील नबं तुकी

विद्यमान
पदग्रहण
२०११
मागील दोरजी खांडू
मतदारसंघ मुक्तो

जन्म २१ ऑगस्ट, १९७९ (1979-08-21) (वय: ४५)
तवांग जिल्हा, अरुणाचल प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी

पेमा खांडू (जन्म: २१ ऑगस्ट १९७९) हे भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व अरुणाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. जुलै २०१६ मध्ये मुख्यमंत्री बनल्यापासून, खांडू व त्यांच्या सरकारने दोन वेळा त्यांची राजकीय संलग्नता बदलली; सप्टेंबर २०१६ मध्ये काँग्रेस ते पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल, आणि डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय जनता पार्टी.[] आधी त्याने काँग्रेस नेता नबाम तुकी ह्यांच्या नेत्तृत्वाखाली पर्यटन, शहरी विकास व जल संसाधन ह्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. []

शिक्षण व वैयक्तिक जीवन

पेमा खांडू हा दिल्ली महाविद्यालयाच्या हिंदू विद्यालयाचा पदवीधर आहे. []

पेमा खांडू हा दिल्ली महाविद्यालयाच्या हिंदू विद्यालयाचा पदवीधर आहे. तो पूर्व मुख्य मंत्री दूरजी खांडू, जे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले, ह्यांचा ज्येष्ठ मुलगा आहे.

कारकीर्द

त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर खांडूला राज्य सरकारात जल संसाधन व पर्यटन मंत्री म्हणून सामील करण्यात आले. तो मुक्तो ह्या त्याच्या वडिलांच्या मतदारसंघातून ३० जून २०११ला अरुणाचल विधान सभेत निर्विवाद निवडून आला. तो काँग्रेस कडून मतदान जिंकला.[]

खांडू अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचा सचिव २००५ मध्ये तर तवंग जिल्हा काँग्रेस समितीचा अध्यक्ष २०१० साली झाला. १६ जुलै २०१६ रोजी तो काँग्रेस विधानसभा पक्ष नेता म्हणून निवडून आला.[]

मुक्तो मधून तोच २०१४ च्या निवडणुकीमधून पुन्हा निवडून आला. १७ जुलै २०१६ला त्याने वयाच्या ३७ व्या वर्षी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.[]

१६ सप्टेंबर २०१६ रोजी, खांडूच्या खाली काँग्रेसच्या ४३ विधान सभा सदस्यांने पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे सदस्यत्व स्वीकारले. पी.पी.ए.ची युती भाजपाशी आहे.[] तेव्हा जरी खांडू हा मुख्यमंत्री होता तरी हे अपेक्षित होता कि एक तर युतीचे सरकार बनणार (कारण विधान सभेच्या अध्यक्षाने पण पक्ष बदलला होता), किव्वा केंद्रीय सरकार अरुणाचलची विधान सभा बरखास्त करून पुन्हा मतदान घेणार.

२१ डिसेंबर २०१६ रोजी खांडूला पक्षातून ६ इतरांसह स्थगित करण्यात आले. ताकाम परिओ हा संभवनीय मुख्यमंत्री होता.[][] पण तेव्हाच खांडू ने बहुसंख्यत्व सामील केले. पी. पी. ए.च्या ४३ पैकी ३३ खासदार भाजपा मध्ये आले. त्यामुळे आणखी २ स्वतंत्र उमेदवारांच्या समर्थनाने भाजपाची संख्या ४५ वर गेली. खांडू अरुणाचल मध्ये भाजपाचा दुसरा मुख्य मंत्री बनला.[१०]

संदर्भ

  1. ^ "Arunachal gets full-fledged BJP govt as Pema Khandu, 32 others join saffron party".
  2. ^ [ttp://www.arunachalpradeshcm.in/comdata.php?displayid=MS-111 "Arunachal Pradesh Chief Minister Nabam Tuki: Cabinet Minister Profile"].
  3. ^ "The Arunachal Times - Archives".
  4. ^ "New council of ministers formed in Arunachal Pradesh".
  5. ^ "Pema Khandu will be the youngest chief minister".
  6. ^ "Arunachal Pradesh : General Election" (PDF).
  7. ^ Congress loses Arunachal two months after it got it, 43 of 44 MLAs defect "Congress loses Arunachal 2 months after it got 43 out of 44 MLAs" Check |दुवा= value (सहाय्य).
  8. ^ Takam Pario likely to be Arunachal CM in 2017 after PPA suspendsKhandu
  9. ^ Takam Pario, the richest Arunachal MLA, may replace Pema Khandu as CM
  10. ^ "Arunachal Pradesh : General Election" (PDF).