Jump to content

पेणांद

  ?पेणांद

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.२४३ चौ. किमी
जवळचे शहरपालघर
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,२०६ (२०११)
• ४,९६३/किमी
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषाकातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

पेणांद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर करवाळे धरणाकडे जाणाऱ्या उजवीकडील मार्गावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६६ कुटुंबे राहतात. एकूण १२०६ लोकसंख्येपैकी ६१५ पुरुष तर ५९१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.६६ आहे तर स्त्री साक्षरता ५९.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४६ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १२.११ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

वेढी, शिलटे, मांजुर्ली, विठ्ठलवाडी, करवाळे, सरतोडी, सरावळी, मांडे, एडवण, डोंगरे, विराथन बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.पेणांद, दहिवले, घाटीम, कांदरवन,आणि नवघर ही गावे नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमध्ये येतात.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/