Jump to content

पेंटॅथ्लॉन

पेंटॅथलॉन हा ग्रीक ऑलिंपिकमध्ये खेळला जाणारा एक क्रीडाप्रकार होता. त्यात खेळाडूला उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, स्प्रिंट (थोडेच अंतर पण भरवेगाने धावण्याची शर्यत) आणि कुस्ती या चार खेळात प्रावीण्य दाखवावे लागे. ऑलिंपिया शहरात ही स्पर्धा इ.स.पू. ७०८मध्ये सुरू झाली, आणि अनेक शतके लोकप्रिय राहिली.

आधुनिक डिकॅथेलॉनसारखी दहा खेळांची स्पर्धा अमेरिकेत १८८४ साली सुरू झाली, आणि १९१२ साली हिचा स्टॉकहोम येथे भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत समावेश झाला. त्यावर्षी ही स्पर्धा जिम थॉर्पने जिंकली.