Jump to content

पूर्व मादागास्कर प्रवाह

पूर्व मादागास्कर प्रवाह मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यालगत हिंदी महासागरातून वाहत असलेला समुद्री प्रवाह आहे.

हा प्रवाह मादागास्करच्या किनाऱ्यालगत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो. २० दक्षिण अक्षांशापासून केप मरी पर्यंत वाहत हा प्रवाह अगुल्हास प्रवाहात विलीन होतो. या ठिकाणी अनेकदा प्रचंड मोठे भोवरे तयार होतात. हे भोवरे कधी घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने तर कधी उलट फिरत असतात. या भोवऱ्यांमुळे येथे नौकानयन धोकादायक आहे.