पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधीलगुवाहाटीच्यागुवाहाटी रेल्वे स्थानक ते दिल्लीमधीलनवी दिल्ली स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेसला गुवाहाटी ते नवी दिल्ली दरम्यानचे १९७४ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात.