पूर्णा
पूर्णा
पूर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्याचे ठिकाण व एक छोटे शहर आहे. पुर्णा महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात परभणीच्या ३५ किमी पूर्वेस तर नांदेडच्या ३९ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली पुर्णाची लोकसंख्या ३६ हजार होती.
पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक एक आहे. मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्गावर असलेले पुर्णा स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येते. अजिंठा एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथून दररोज धावतात.