Jump to content

पुरुष सूक्त

पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे (ऋग्वेद १०.९०). हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. या सूक्तामध्ये मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे. चातुर्वर्णाचाही उल्लेख आहे. यात यज्ञाचे वर्णन केले आहे. या सूक्ताची देवता पुुुरुष आहे आणि ऋषी नारायण हेे आहेेत. हे ऋग्वेेदातील एक प्रसिद्ध तत्त्वज्ञानविषयक सूक्त आहे.

षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एका एका उपचारासाठी वापरली जाते.

पुरुषसूक्त आणि त्याच्या प्रत्येक ऋचेचा अर्थ

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: पुरुष सूक्त हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:पुरुष सूक्त येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.

* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:

सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः पुरुष सूक्त आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा पुरुष सूक्त नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:पुरुष सूक्त लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.

* असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित पुरुष सूक्त ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित पुरुष सूक्त ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.

हरिः ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।

स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशांगुलम्॥१॥

अर्थ- विराट अशा पुरुषाला सहस्र डोळे आणि सहस्र पाय आहेत. तो सर्व भूमीला सर्वस्वी व्यापून आणि दहा अंगुळे(बोटे) वर उरलाच आहे

पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।

उतामृतत्त्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥२॥

अर्थ- हे विद्यमान जग म्हणजेच हा विराट आदी पुरुषच आहे. अमृततत्त्वाचा स्वामी हाच आहे. त्याला केवळ इच्छा झाली, म्हणूनच तो प्राणिमात्रांना निमित्तभूत असलेल्या अन्नाद्वारे या जगात प्रकट झाला आहे.

एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुषः।

पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥

अर्थ- याचा महिमा काय वर्णावा ? या सर्व दृश्य विश्वापेक्षा तो कितीतरी मोठा आहे. या विश्वातील सृष्टी हा केवळ एक चतुर्थांश भाग द्युलोकात आहे.

त्रिपादूर्ध्व उदैत् पुरुषः पादोस्येहाभवत् पुनः।

ततो विष्वङ् व्यक्रामत् साशनानशने अभि॥४॥

अर्थ- द्युलोकात ज्योतिरूपाने राहिलेल्या या आदिपुरुषाचा एक अंश उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारे या विश्वात पुनः पुन्हा प्रकट होतो. सचेतन असे प्राणी समुदाय आणि अचेतन सृष्टी या सगळ्यांत अनेक रूपांनी तो वावरत आहे.

तस्माद् विराळजायत विराजो अधिपूरुषः।

स जातो अत्यरिच्यत पश्चाद् भूमिमथो पुरः॥५॥

अर्थ- त्या आदिपुरुषापासून ज्याच्या ठायी विविध वस्तू झळकत असतात असा विराट देह उत्पन्न झाला. त्याच्या आश्रयाने एक पुरुष आपल्या मायेच्या शक्तीने ब्रह्मांड उत्पन्न करून स्वतः त्यातच प्रविष्ठ झाला. आणि त्यातूनच पुढे अखिल सृष्टिजात निर्माण झाली.

यत् पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत।

वसन्तो अस्या सीदाज्यम् ग्रीष्म इध्मः शरद्धविः॥६॥

अर्थ- देवांनी नंतर या पुरुषाच्या स्वरूपाचाच हविर्भाग करून मानसिक यज्ञ आरंभिला. त्यात वसंत ऋतू हे तूप, ग्रीष्म हे इंधन आणि शरद हा हविःशेष कल्पिला.

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः।

तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥७॥

अर्थ- त्या यज्ञसाधनभूत पुरुषावर प्रोक्षण करण्यात आले. त्या प्रथम झालेल्या जीवांनी यज्ञ केल्यामुळे सृष्टी उत्पन्न करण्यास समर्थ देव आणि सृष्टी संरक्षण करण्यास आवश्यक ज्ञान देणारे ऋषी उत्पन्न झाले.

तस्माद् यज्ञात् सर्वहुतः संभृतं पृषदाज्यम् ।

पशून्तांश्चक्रे वायव्य नारण्यां ग्राम्याश्च ये ।।८॥

अर्थ- ह्या यज्ञापासून दही, तूप इ. पोषणास आवश्यक असे पदार्थ तयार झाले. त्याच प्रकारे जे वायूवर पोसतात ते वन्य आणि ग्रामीण पशू हेही या यज्ञापासून तयार झाले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे।

छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥९॥

अर्थ- या यज्ञापासूनच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि गायत्र्यादी छंद तयार झाले.

तस्मादश्वा अजायंत ये के चोभयादतः।

गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥१०॥

अर्थ- याच यज्ञापासून घोडे, दोन्ही बाजूंना दात असलेले इतर पशु-गाई, मेंढ्या वगैरे प्राणी तयार झाले.

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।

मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥११॥

अर्थ- जो हा विराट पुरुष उत्पन्न केला गेला तो किती प्रकारे उत्पन्न केला गेला ? त्याचे तोंड कोणते ? त्याचे हात, मांड्या आणि पाय कोणते म्हणले जाते?

ब्राह्मणोऽस्य मुखामासीद् बाहू राजन्यः कृतः।

ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१२॥

अर्थ- त्या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख होते. क्षत्रिय हे बाहू, वैश्य हे मांड्या तसेच शूद्र हे पायांपासून उत्पन्न झाले.

चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत।

मुखाद् इंद्र्श्चाग्निश्च प्राणाद् वायु रजायत ॥१३॥

अर्थ- त्याच्या मनापासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, तोंडापासून इंद्र आणि अग्नी तसेच प्राणापासून वायू उत्पन्न झाला.

नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णोद्यौः समवर्तत।

पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथालोकॉं अकल्पयन्॥१४॥

अर्थ- याच्या नाभीपासून आकाश, मस्तकापासून द्युलोक, पायापासून भूमी, कानापासून दिशा उत्पन्न झाल्या. सर्व लोक हे याच्यापासूनच उत्पन्न झाले आहेत.

सप्तास्यासन्परिधयः त्रिःसप्त समिधः कृताः।

देवा यद् यज्ञं तन्वाना अबन्धन्पुरुषं पशुं॥१५॥

या यज्ञात गायत्र्यादी सात छंद हे परिधी, आणि महिने, ऋतू, तिन्ही लोक व सूर्य मिळून एकवीस समिधा अशी कल्पना करून देव यज्ञ करू लागले. त्या विराट पुरुषाला त्यांनी यज्ञीय पशू कल्पिला.

यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।

ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवा:॥१६॥

अर्थ- देवांनी यज्ञद्वाराचे याज्ञ्यस्वरूप अशा प्रजापतीचे पूजन केले. तीच कृत्ये जगदुद्धार करणारी, जगाच्या वाढीला कारण झाली. ज्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीला साधक असणारे देव असतात, ते स्वर्गरूपी स्थान त्यांची उपासना करणाऱ्यांना प्राप्त होते.